मुंबई येथे ‘पद्मावती’ चित्रपटाच्या ट्रेलरला विरोध केल्यामुळे अजयसिंह सेंगर आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांना अटक

0
653
Google search engine
Google search engine

मुंबई –

 

 

अंधेरी पश्‍चिम येथील लोखंडवाला परिसरातील मेगा पी.व्ही.आर् येथे आगामी ‘पद्मावती’ चित्रपटाच्या ट्रेलरच्या प्रदर्शनाला ३१ ऑक्टोबरला हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक विरोध करण्यासाठी एकत्रित आले होते. या वेळी उपस्थित सहस्रो कार्यकर्त्यांनी चित्रपटाला विरोध दर्शवला. या वेळी महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष श्री. अजयसिंह सेंगर, तसेच हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. भूषण चव्हाण, श्री. प्रियेश जसवाल, श्री. प्रवीण बनसोडे आणि अन्य कार्यकर्ते यांना आंबोली पोलिसांनी कह्यात घेतले. (अन्य धर्मियांच्या ऐतिहासिक व्यक्ती, प्रतिके, श्रद्धास्थाने यांच्या अवमानाविषयी पोलिसांनी अशीच भूमिका घेतली असती का ? शांततेच्या मार्गाने विरोध करण्याचाही अधिकार पोलीस हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी यांना देत नाही का ? – संपादक)

या चित्रपटात राणी पद्मावतीला खिलजीची प्रेमिका दाखवण्यात आली असून तिला चित्रपटात नाचतांना दाखवण्यात आले असल्याचे सांगत श्री. सेंगर यांनी आक्षेप घेतला आहे आणि ‘हा चित्रपट देशात प्रदर्शित करू नये’, अशी मागणी केली आहे. या वेळी संजल लीला भन्साळी यांच्या चमूने या चित्रपटाला चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर) मान्यता दिली आहे. तेव्हा सेंगर यांनी सांगितले की, मंडळ पैसे खाऊन मान्यता देते. त्याच वेळी भन्साळी यांच्या चमूने पोलिसांना बोलावले आणि पोलिसांनी चित्रपटाला विरोध करणार्‍यांना कह्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा हिंदुत्वनिष्ठांना सोडून दिले.