चिलाटी नाल्यावरील पूल कधी पूर्ण होणार – अपघात होण्याची शक्यता

0
887
Google search engine
Google search engine

पुलाचे बांधकाम लवकरात लवकर करा :- श्री समीर देशमुख

बादल डकरे / चांदुर बाजार –

चांदुर बाजार ते वलगाव जाणाऱ्या रोडवरील चिलाती नाल्यावरील पुलाचे बधकाम गती एकदम हळुवार स्वरूपात चालू असल्याने या संदर्भात कॉग्रेस ने आक्रमक पवित्रा घेतला.
पावसाळा लागण्या अगोदर सुरुवात झालेल्या चिलटी नाल्यावरील पूल अजून पर्यन्त पूर्ण झाला नाही त्यामुळे या हळुवार चालणाऱ्या कामापुळे पुलामुळे मोठ्या अपघात होण्याची शकता वर्तवली जात आहे.पूल जवळ तहसील कार्यलय असल्याने तसेच वलगाव -अमरावती जाण्याकरिता हाच रास्ता असल्याने या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते.बांधकाम पुला च्या बाजूला पेट्रोल पंप असल्याने पेट्रोल पंप वरून बाहेर पडताना एखादा अपघात होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
दररोज गो सी टोम्पे महाविद्यालयात विद्यार्थ्यांना याना येणे जाणे करावे लागतात त्याच प्रमाणे अनेक ग्रामीण भागातील वाहतूक याच रोडवरून होत असल्याने रोड लहान आणीवाहतुक जास्त असे चित्र आहे तरी याचे बांधकाम लवकरात लवकर व्हावे अशी मागणी परिसरातील नागरिकडून होत आहे.

या पूलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने या पुलाचे बांधकाम लवकरात लवकर करावे जेणे करून कोणत्याच प्रकारची हानी होणार नाही. :- किशोर देशमुख चांदुर बाजार

<>●<>●<>●<>●<>●<>●<>●<>●<>●<>●

या पुलाचे बांधकाम सुरू असल्याने महाविद्यालयात जाणाऱ्या विध्यार्थी याना बाजूच्या पुलावरून येणे जाणे करावे लागतात तसेच वलगाव अमरावती बसेस सुद्धा याचा मार्गाने जातात.अनेक ग्रामीण भागातील लोक याच रोडने ये जा करतात बाजूला तहसील ,समोर पट्रोल पंप आहे.बऱ्याच मोठ्या प्रमाणात या रोडवर वाहतूक करण्याची वर्दळ आहे तरी लवकरात लवकर मुख्य पुलाचे काम पूर्ण करावे नाहीतर कॉग्रेस आक्रमक पवित्रा घेणार.
:– समीर देशमुख युवक कॉग्रेस अध्यक्ष अचलपूर मतदार संघ