प्रहार जन शक्ती पक्षाच्या नोंदणीला चांदुर बाजार तालुक्या उत्कृष्ट प्रतिसाद – युवकाचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद

0
618
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार / बादल डकरे –

प्रहार पक्ष संस्थापक आमदार श्री बच्चू कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाच्या सदस्य नोंदणी करिता सहभागी होण्याचे आवाहन केले होते.या सदस्य नोंदणीला संपूर्ण महाराष्ट्र त 1 नोव्हेंबर ला सुरुवात झाली असून चांदुर बाजार येथील प्रहार पक्ष कार्यलयमध्ये सुद्धा युवकांनि मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे.

प्रहार पक्ष हा एकमेव पक्ष आहे की त्याला एवढ्या प्रमाणात सदस्य नोंदणीला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे प्रहार पक्षाची लोकप्रिय वाढत जात असल्याचे दिसत आहे तसेच या संपूर्ण सदस्य नोंदणी करिता प्रहार कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर मेहनत घेत असल्याचे दिसत आहे.
चांदुर बाजार प्रहार पक्ष येथील सदस्य नोंदणी दरम्यान जिल्हा प्रमुख प्रहार पक्ष मंगेश देशमुख,दिपक भोगाडे, अभिजित बोंडे पंचायत समिती सदस्य,निखिल ठाकरे प्रहार विध्यार्थी संघटना चांदुर बाजार,निलेश वाटणे,माजी उपाध्यक्ष नगर परिषद चांदुर बाजार मुज्जफर हुसेन,माजी अध्यक्ष रहेमान भाई,मनोज जैयस्वाल,नदुभाऊ भाऊ विधळे तालुका प्रमुख प्रहार शेतकरी संघटना, पवन वाट ,सचिन खुळे नगरसेवक ,राजेश सोलव,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.