चांदुर बाजार पंचायत समिती सभापती याचे पद निकामी जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने सदस्य पद झाले रद्द

0
529
Google search engine
Google search engine

ईश्वर चिठी ने झाली होती सभापती करीत निवड

चांदुर बाजार / बादल डकरे –

चांदुर बाजार तालुक्यातील पंचायत समिती सभापती यांचे सदस्य पद जात प्रमाणपत्र रद्द ठरल्याने त्याचे सदस्य पद रद्द झाले आहे.त्यामुळे पंचायत समिती पद आता निकामी झाले आहे.
पंचायत समिती करजगाव सर्कल मधून अरुणा ताई उईके याची निवडणूक मधून निवडनू आल्या होत्या.प्रहार पक्ष 6 सदस्य होते तरी सभापती पद हे अनुसूचित जमाती करिता राखीव असल्याने आणि प्रहार पक्ष कडे सदस्य संख्या जरी अधिक होती तरी बाकीचे पक्ष एक झाल्याने त्यांची सदस्य संख्या पण 6 होती त्यामुळे सभापती यांची निवड ईश्वर चिठी ने झाली होती.दिनांक 14 मार्च 2017 ला सभापती यांनी आपला पदाचा कार्यभार सांभाळला होता.

अजय तायडे यांनी निवडणून आलेल्या सदस्य अरुणा ताई उईके यांच्या जात प्रमाणपत्र तपासणी करीत अनुसूचित जमाती जात तपासणी समिती कडे तक्रार दाखल केली होती.सादर तक्रारीवरून समिती ने त्यांचे जात प्रमाणपत्र पत्र रद्द ठरविले आहे.त्यामुळे सभापती आणि सदस्य पद ही जाणार आहे.
या सर्व प्रकारामुळे तालुक्यातील राजकीय हालचाली ला पुन्हा वेग आला आहे.