वाढदिवस व नवीन गाडीच्या सेलिब्रेशनचा रंग बाकी असतानाच आशिष वर काळाचा घाला

0
785

आकुर्डी/ निगडी/-

ट्रकच्या धडकेत 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा अंत

चार दिवसापूर्वी झालेला वाढदिवस अन् अठराव्या वर्षाच्या उंबरठ्यातच काळाचा घाला. तरुणपणात अनेक धोके असतात असे जुने जाणते म्हणतात ते काही चुकीचे नाही. सध्या कानात हेडफोन घालून भरधाव वेगाने गाडी चालवणे हा देखील एक धोकाच आहे. जो आज आशिषच्या जिवावर बेतला. घरातून कॉलेजसाठी निघालेला तरुण अवघ्या तासाभरात देवाघरी गेला.

आशिष त्याच्या मित्रासोबत (एम एच 14 एआय 8748) या अॅक्टिव्हा गाडीवरून खंडोबा चौकातून म्हाळसकांत चौकाकडे जात होता. यावेळी त्याला नवीन चासी असणाऱ्या ट्रकने धडक दिली यात आशीशच्या डाव्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व तो जागीच मरण पावला तर त्याचा मित्रही गंभीर जखमी झाला आहे. आशीशच्या अशा जाण्याने घरच्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.