दापोरी येथे स्वाभिमानीचे बैलगाडीसह भव्य चक्काजाम आंदोलन – दंगा नियंत्रक पथकासह पोलीस बंदोबस्तात चक्काजाम !

0
1112

मोर्शी तालुक्यातील शेकडो शेतकरी झाले आंदोलनात सहभागी !

१५ दिवसात गारपीट ग्रस्त संत्रा शेतकऱ्यांचे अनुदान होणार जमा !

रुपेश वाळके / मोर्शी –

मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दापोरी येथे शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीय भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात आले, शेतकऱ्यांना ऐन दुष्काळात वीज कनेक्शन बंद केल्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. यामुळे शेतकऱ्यांची गत ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी झाली आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची ही स्थिती समोर आल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.वीज वितरण कंपनीने सुरू केलेली वीज कनेक्शन कट करण्याची मोहिम शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असून वीज वितरण कंपनीने वीजबिल वसुलीसाठी वीजपुरवठा कट करण्याची मोहिम सुरू केली आहे.

मोर्शी तालुक्यात २०१६ मध्ये फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेली संत्रा शेती आणि शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने विशेष पॅकेज जाहीर केले. मात्र, या पॅकेजच्या प्रतीक्षेत संत्रा उत्पादक तत्कळत बसला असून मोर्शी तालुक्यातील शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेतच आहे , शेतकऱ्यांचे ५० टक्क्यांवर पिकांचे नुकसान झालेले होते तालुक्यातील जवळपास ८०० शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात गारपीट झेलणार्‍या शेतकर्‍यांना शासन मदत देत नाही आम्ही काय गुन्हा केला, असा प्रश्न मोर्शी तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकरी विचारत आहेत. प्रशासनाच्या या लालफीतशाहीमुळे शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, त्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात दापोरी भव्य बैल बंडीसह चक्काजाम आंदोलन करण्यात आले .

शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्यापूर्वी शेतकऱ्यांना शेती पंपाची बिले देऊन पंधरा दिवसा आधी ग्राहकास नोटीस पाठवणे आवश्यक पण तसे होतांना दिसत नाही आणि शेतकऱ्यांना अजूनही कृषी पंपाचे वीज बिल अजूनही मिळाले नाही . शेतकऱ्यांना कोणतीही सूचना न देता वीज उपकेंद्रातूनच वीज पुरवठा खंडित करणे हे कोणत्याच कायद्यात बसत नाही. वीज मंडळाची ही मोहिम बेकायदेशीर असल्याचा आरोप देवेंद्र भुयार यांनी केला आहे.

शेतकऱ्यांचे सोयाबीनचे नुकसान झाले, कपाशीला भाव नाही आणि संत्राला आता मातीमोल भाव मिळत आहे . उत्पादन खर्च तर सोडा साधा तोडणीचा खर्च निघणे कठीण असतांना शासन मात्र मुक गिळुन बसले आहे. जो पर्यत शेतकऱ्यांना सरकार मदत करीत नाही त्यांच्या मागण्या मान्य होत नाही तो पर्यत आपण स्वस्त बसणार नाही असे आवाहन करीत राज्य सरकारला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख देवेंद्र भुयार यांनी यावेळी शासनाला ईशारा दिला . गेल्या काही दिवसापासुन शेतकऱ्यांची परिस्थीत आज हालाखीची आहे. बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतक-यांचा शेकडो टन संत्रा झाडालाच लटकलेला आहे . संत्रा तोडणे सुध्दा परवडत नसल्याने संत्रा झाडालाच आहे. तो आता गळुन पडत आहे. वीज कनेक्शन तोडणी थांबवून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी तात्काळ वीज पुरवठा सुरू करावा पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी , फळ पीक विम्याचा सर्व्हे करून तात्काळ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ विदर्भ अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात दापोरी येथे आज चक्काजाम आंदोलन झाले यावेळी ताहसीलदार अनिरुद्ध बक्षी यांनी आंदोलनाला भेट देऊन १५ दिवसात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार असल्याचे आश्वासन दिले त्यानंतर चक्काजाम आंदोलन चालू असतांनी पोलीस प्रशासनाने देवेंद्र भुयार व त्यांच्या कार्यकर्त्यांना तात्काळ अटक करून गुन्हे दाखल केले यावेळी शेतकऱ्यांमध्ये प्रशासविषयी संतापाची लाट पाहायला मिळाली या आंदोलनामध्ये मोर्शी तालुक्यातील शेकडो शेतकरी दापोरी येथील चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले होते .

अपराध क्र ५६५/१७ कलम १३५ मु.पो.का. अंतर्गत यांच्यावर झाले आंदोलनाचे गुन्हे दाखल !

देवेंद्र महादेव भुयार युवा स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भ अध्यक्ष . नितीन बाबाराव ढोमने . आशिष प्रकाश वानखडे . अमोल भीमराव महल्ले . रवींद्र शंकर पाटील . हर्षल श्रीधर राऊत स्वप्नील नरेंद्र राऊत . ऋषिकेश धनराज राऊत सुनील गुलाबराव केचे . प्रशांत विश्वास पन्नासे .राहुल प्रमोद भाकरे .महेश हरिदास उदासी .रोशन विनायक भोरगडे व ईतर २०० ते २५० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत .