शासकिय औद्योगिक प्रशिक्षण शिक्षण संस्था (ITI) येथील अस्वच्छते  बाबत भाजयुमो विद्यार्थी आघाडी आक्रमक

0
926

अमरावती :-

दि. ३०/१०/१७ रोजी भाजयुमो विद्यार्थी आघाडी अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष श्री सागर महल्ले यांच्या अध्यक्षतेत व सरचिटणीस निरज कोकाटे यांच्या नेतृत्वात शासकिय औद्योगिक प्रशिक्षण शिक्षण संस्था येथील प्राध्यापक यांना निवेदन देण्यात आले. तेथील महिला व पुरुष स्वच्छतागृह अतिशय घाण परिस्थिति मध्ये असल्याचे निदर्शनाश आले. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका असून ते लवकरात लवकर स्वछ करावे अन्यथा त्रीव आंदोलन करण्यात येईल हा ईशारा देखील देण्यात आला. ह्यावेळी भाजयुमो विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष सागर बामबल व श्रेयश वाघमारे तसेच सचिव आशीष चव्हाण व कार्यकारिणी सदस्य विमल पांडे , निहाल मोडकर , तुषार मोहोड उपस्थित होते.