आष्टी येथील प्रा.आ.केंद्रात फळ वाटप  – मराठी पत्रकार संघाचा उपक्रम

0
902

वाठोडा शुक्लेश्वर :- गजानन खोपे /भातकुली

तालुक्यातील आष्टी येथील

शहरातील सुविख्यात पत्रकार अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अमरावती जिल्हाध्यक्ष श्री अनिलभाऊ अग्रवाल यांच्या वाढदिवस निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णाना फळ वाटप करुन पत्रकार,जनसामान्य व असंख्य रुग्णाच्या सानिध्यात सपन्न झाला.यावेळी आज ऑपरेशनचा कँम्प असल्यामुळे फार मोठ्याप्रमानात रुग्ण हजर होते.यावेळी सर्व रुग्णाना फळवाटप करण्यात आले. एक सामाजीक बाधीलकी जपत रुग्णाना आधार देण्याचा प्रयत्न यावेळी भातकुली मराठी पत्रकार संघातर्फे केल्याचे भातकुली तालुका अध्यक्ष श्री संतोष शेंडे यांनी सागितले. श्री अनिलभाऊ अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्य या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भातकुली तालुका अध्यक्ष संतोष शेंडे तर प्रमुख अतिथी म्हनुन प्रकाश बोबडे,डॉ.राजेंद्र दाळु हे होते.प्रमुख उपस्थिती सादिक भाई,आर.टी.आय कार्यकर्ते विजय मुडाले,शिवसेना तालुकाप्रमुख तथा राष्ट्रिय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष निलेश जामठे,हे होते.यावेळी या कार्यक्रमाला आरोग्य अधिकारी डॉ.मगला मोहोळ,आर एस लादे,आर एस,वानखडे,सुनिल विसपुते,भगवत गोलाईत,दिलीप नेताम,पी.पी.नवले,जि.डब्लु मावळे,श्रीमती दुर्गा क्षीरसागर, श्रीमती मिरा मोरे,अजय घोसे प्रामुख्याने उपस्थित होते. संतोश शेंडे यांनी रुग्णसेवा हि खरी ईश्वर सेवा म्हणुन उपस्थितांना संबोधित केले.यावेळी प्रमुख अतिथी मो.सादीक यांनी सामाजीक योगदान देऊ असे उपस्थित सर्व रुग्णाना आश्वासन दिले.या कार्यक्रमचे संचालन गजानन खोपे यांनी केले.तर आभारप्रदर्शन विक्रांत खेडकर यांनी केले.या कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते ,