आमदार कडू याच्या मध्यस्थीने सुटले एक दिवसीय उपोषण – दोघाजणांवर गुन्हे दाखल -शिरजगाव कसबा येथील महाराष्ट्र बँक प्रकरण

0
728

बँक च्या पासबुक वर नोंदबंदी च्या वेळेस च्या 20000 रुपये काढल्याचा नोंदी

बादल डकरे / चांदुर बाजार /-

चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील महाराष्ट्र बँक मधील रक्कम परस्पर काढल्या गेल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे तर या सर्वाचे पैसे लवकरात लवकर जमा करावे करिता आज महाराष्ट्र बँक समोर प्रहार संघटनेचे एक दिवसीय उपोषण करण्यात आले होते.या दरम्यान अनेकांनी आपल्या तक्रारी केल्या तर जी रक्कम काढल्या गेली तिचा आकडा हा 17 लाखाच्या वर गेला असल्याचे दिसून आले.तसेच बँक पास वरील एन्ट्री पहिली असता त्यावर नोटबंदी नंतर ज्या वेळेस फक्त 2000 रुपये मिळत होते त्याच्या वेळेस च्या 20000 रुपये काढल्याचा नोंदणी असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी बँक मध्ये खाजगी काम करणाऱ्या दीपक पुरी आणि रोकड अधिकारी विश्वास दाईत याच्यावर गुन्ह्याची नोंद केली तर तपास करताना यामध्ये

आणखी संख्या वाढू शकणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे .तर तिकडे प्रहार संघटना अधिक आक्रमक झाली आहे ज्या 36 खातेदार याच्या रक्कम काढली गेली त्या पैकी साधारणतः हे मोल मजूर करणारे लोक आहे.आता याना न्याय मिळेल का? आणि ज्यांनी हा व्यवहार केला त्याचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर खातेदार आपले पैसे मिळावे याकरिता पायपीट करताना चे चित्र आहे.
सायंकाळी 5 च्या आमदार श्री कडू यांच्या मध्यस्थीने हे उपोषण सुटले.या वेळी आमदार कडू यांनी बँक अधिकारी याना चांगलेच खडसावले आणि कार्यवाही करून खातेदार याचे पैसे लवकरात लवकर परत करण्याचे लेखी आश्वासन घेतले.यावेळी ज्या खातेदार यांच्या खात्यातील रक्कम काढली गेली होती त्यांनी आमदार कडू याचे आभार मानले.
त्यामुळे आमदार यांनी गरिबाला न्याय मिळून दिला.या उपोषणाला सरपंच अविनाश बदुकले, उपसरपंच अ.लुखातर शे.हारून, संजय झिगरे,नामदेवराव सावरकर,बबलुभाऊ आवारे,अंकुश शिरभते,सचिन मते, विजय धुर्वे ,अक्षय गुर्जर ,इत्यादी प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.या उपोषणाला नायब तहसिलदार विजय गोहड,नायब तहसिलदार गजानन पाथरे,लिपिक निलेश फुटाणे यांनी भेट दिली आणि उपोषण संपल्याची माहिती घेतली.