रेगाव येथे सभामंडपाचे निकृष्ट दर्जाचे काम

0
1357
Google search engine
Google search engine



महेंद्र महाजन जैन /  रिसोड 

वाशिम –

मालेगाव तालुक्यातील रेगाव  येथे जिल्हा परिषद सदस्यांच्या कमिशन खोरीमुळे नित्कृस्ट दर्जाच्या विकास बांधकामाचा सपाटा सुरु आहे एका माजी मंत्र्याची चमचेगिरी करणारा जिल्हा परिषद सदस्य कमिशांपोटी निधी आणून स्वतःचा आलिशान बंगला बांधण्याचे स्वप्न रंगवत आहे धार्मिक स्थळालाही या जिल्हा परिषद सद्सयाने सोडले नसून मेडशी सर्कल मध्ये होणारे तिर्थक्षेत्राची कामे नित्कृस्ट दर्जाची होत असल्याने जनतेच्या धार्मिक भावना दुखाविल्या जात आहेत रेगाव येथे 7 लाख रुपयांचे एका मंदिराचे सभामंडपाचे काम सुरु आहे सदर सभामंडप नित्कृस्ट दर्जाचे बांधण्यात आले असून नवीन पाया न खोदताच जुन्या पायावर बांधकाम उचलण्यात आले आहे कॉलम खोल न खोदताच उचलण्यात आले आहे कॉलम चे बांधकाम मेजरमेन्ट मध्ये  न होता वेडे वाकडे करण्यात आले आहे   सभामंडपाला नित्कृस्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात आला आहे स्लॅब टाकताना लहान गिट्टी चा चांगल्या रेतीचा आणि सिमेंटचा जादा प्रमाणात वापर करण्यात आला नसल्याची माहिती मिळाली आहे काही भागात स्लब टाकण्यात न आल्याने कमिशनखोर वृत्ती देवालाही सोडत नसल्याचे रेगाव एक उदाहरण आहे कोणत्याही शासन विकास कामावर अंदाजकीय फलक लावण्याचा शासन निर्णय असताना येथे शासन निर्णयाची पायमल्ली होताना दिसत आहे या भागात कंत्राटदार व अधिकाऱयांची मिलीभगात असल्याने तालुक्यातील सर्वच कामे नित्कृस्ट दर्जाची होत आहेत वरिष्ठ अधिकाऱयांनी मालेगाव तालुक्यातील विकास बांधकामाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे