डीएसकेच्या अडचणी वाढणार ; कोल्हापुरातही गुन्हा दाखल ?

0
757
Google search engine
Google search engine

कोल्हापूर : पुण्यातील प्रसिध्द डीएसके ग्रुपचे मालक दीपक सखाराम कुलकर्णी व हेमंती कुलकर्णी यांच्या अडचणीत परत एकदा वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून दाखल असलेल्या गुन्ह्य़ात डी. एस. कुलकर्णी यांना विशेष न्यायालयाकडून मंगळवापर्यंत तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला असला तरी त्यांच्याविरोधात आज कोल्हापुरातही गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 

कोल्हापुरातही पन्नास गुंतवणूकदार थेट राजारामपूरी पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, कुलकर्णी दाम्पत्याच्या विरोधात तक्रार नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ठेवीदार असोसिएशनचे अध्यक्ष बी. डी. किल्लेदार हे स्वत: फिर्यादी असून त्यांचा जबाब पोलीस नोंदवित आहेत. कोल्हापूर शहरासह, ग्रामीण भागातील शेतकरी, सेवानिवृत्त शिक्षक, व्यापारी व इतर व्यवसायातील सहाशे गुंतवणूकदारांनी १ लाखांपासून ते १० कोटींपर्यंत अशा सुमारे दोनशे कोटींच्या ठेवी ‘डीएसके’मध्ये ठेवल्या आहेत. कोल्हापूरातील ही सर्वांत मोठी फसवणूक आहे.

गुंतवणकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेत ३४५ तक्रारी दाखल झाल्या असून, त्यातील रक्कम २५ कोटी ६५ लाख रुपये इतकी आहे़ आतापर्यंत ९४५ जणांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी दाखल केल्या आहेत़.