अश्लील शिवीगाळ व धमकी प्रकरणात आरोपीला, शिक्षा

0
2561
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी :- गजानन खोपे

वाठोडा शुक्लेश्वर :- अश्लील शिवीगाळ करू जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी आरोपी ला भातकुली न्यायल्याने एक हजार दंड न भरल्यास आठ दिवसाची कारावासाची शिक्षा सुनावली आहे, गोपाल केशव बेलसरे,असे आरोपीचे नाव आहे,२०एप्रिल २०१२ रोजी आरोपी गोपालने प्रदीप खालोकार यांना सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.फिर्यादीने खोलापूर पोलीस स्टेशन येथे गोपाल बेलसरे विरूध्द तक्रार दाखल केली होती,त्या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम २९४.५०६अन्व ये आरोपी वर गुन्हा दाखल करुन पुढील तपास केला, आणि दोषारोप पत्र प्रथम श्रेणी न्यायादंडधिकारी श्री जी.डी.अग्रवाल यांचे न्यायालयात केले,तसेच सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता सौ.वर्षा तिवारी,यांनी साक्षीदार तपासून युक्तीवाद केला, याप्रकरणी न्यायालयाने

आरोपीस एक हजार दंड न भरल्यास आठ दिवस कारावासाची सजा ठोठावली आहे,