चांदुर रेल्वेच्या शिक्षीकेचा नांदगावात संशयास्पद मृत्यू – मर्डर झाला असल्याचा अंदाज

0
711

चांदुर रेल्वे – (शहेजाद  खान) 

 

आजच्या धकाधकीच्या जिवणात चोऱ्या, वाटमाऱ्या, मारहान, खुन असे प्रकार खुप मोठ्या प्रमाणात वाढले असुन अशाच प्रकारची घटना मंगळवारी नांदगाव खंडेश्वर येथे घडली आहे. चांदुर रेल्वे येथील शिक्षीका सौ. कविता कटकतलवारे (इंगोले) यांचा नांदगाव येथे संशयास्पद मृत्यु झाला असुन हा खुन झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

सौ. कविता कटकतलवारे (इंगोले)

प्राप्तमाहितीनुसार स्थानिक मेहेरबाबा नगर मधील रहिवासी सौ. कविता कटकतलवारे (इंगोले) (वय- 40) ह्या नगर परीषद, चांदुर रेल्वे मार्फत चालविण्यात येणाऱ्या श्री. छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक शाळेत तिसऱ्या वर्गाला वर्गशिक्षिका म्हणुन गेल्या 10 वर्षापासुन कार्यरत होत्या. मंगळवारी शाळा संपल्यानंतर त्या सायंकाळी चांदुर रेल्वे वरून नांदगाव ला निघाल्या होत्या. परंतु नांदगाव खंडेश्वर वरून 4 कि. मी. अंतरावर असलेल्या येणस गावाजवळ त्यांचा मृतदेह सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या काही लोकांना बुधवारी आढळला. मंगळवारी चांदुर रेल्वे वरून निघाल्यानंतर काय झाले हे अजून गुपित असून त्याच वेळी त्­यांचा मृत्यू झाला असावा असाही अंदाज व्य­क्त करण्यात येत आहे. सौ. कटकतलवारे ह्या हरहुन्नरी शिक्षिका म्हणून ओळखल्या जायच्या. अति­शय प्रेमळ व उत्साही शिक्षिका म्हणून त्या शिक्षण क्षेत्रात परीचित होत्या. बुधवारी सकाळी त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच शिक्षक वर्गामध्ये तसेच शहरातही विविध चर्चेला उधाण आले आहे. सर्वांशी मिळून मिसळून व प्रेमाने राहणाऱ्या व्यक्तीचा असा संशयास्पद मृत्यू होणे हा एक धक्कादायक प्रकार असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. त्यांचा मृत­देह प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी त्यांचा गळा आवळून खून झाला असावा असा अंदाज वर्तविला केला. सौ. कविता कटकतलवारे यांचे पती किर्तीराज इंगोले हे सुध्दा शिक्षक असुन ते तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथील इंदिरा गांधी कन्या शाळेत कार्यरत आहे. गेल्या 2-3 महिन्यांपासुन पतीचे व त्यांचे काही कारणास्तव पटत नसल्यामुळे सौ. कविता ह्या त्यांच्या माहेगावी नांदगाव खंडेश्वर वरून चांदुर रेल्वेला दररोज ये-जा करीत होत्या. त्यांना 1 मुलगा व 1 मुलगी असुन दोघेही वडिलांजवळ राहत होते.
      सदर घटनेची माहिती मिळताच नांदगाव खंडेश्वर पोलीसांनी प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरीता पाठविले होते. वृत्तलिहोस्तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती. पुढील तपास नांदगाव खंडेश्वर पोलीस करीत आहे.  तरी नांदगाव खंडेश्वर पोलीसांनी या शिक्षीकेच्या मारेकऱ्यास त्वरीत अटक करावी अशी मागणी चांदुर रेल्वे येथील शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.