अत्याचार करुन खून केल्याप्रकरणी   तिन्ही आरोपीना  फाशिचि शिक्षा  -लोणी मावळा अत्याचार प्रकरण

0
815
Google search engine
Google search engine

प्रतिनिधि – ऊमेर सय्यद

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथील दहावीतील मुलीवर 22 ऑगस्ट 2014 रोजी अत्याचार करुन खून केल्याप्रकरणी तिन्ही आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून तिघांना फाशिचि शिक्षा दिली आहे ! तर तब्बल 4 वर्ष चाललेल्या या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अँडव्होकेट श्री उज्वल निकम यांनी एकूण 32 साक्षीदार तपासत युक्तिवाद केला अन आज अखेर या तिन्ही आरोपीना फाशिचि शिक्षा ठोठावण्यात आली आहे ! यातील आरोपींचा क्रुरपणा गावातील प्रत्येकाला हादरवून टाकणारा होता.
संबंधित मुलगी अळकुटी येथील हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होती. वाडीवर राहत असल्याने शाळा सुटल्यानंतर ती पायीच घरी येत होती. तिच्यावर पाळत ठेवलेल्या तिघा आरोपींनी तिला रस्त्यात अडवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिचा म्रुत्यू देह चारीत फेकून दिला. त्याच दिवशी मुलीचा मृतदेह ग्रामस्थांना मिळून आला. या घटनेने हे संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता.
पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथील एका वाडीतील मुले एसटी बसने अळकुटी येथे माध्यमिक शाळेत जातात. २२ ऑगस्ट २०१४ रोजी सकाळी साडेनऊ वाजता पीडित मुलगी ही शाळेत गेली होती. चाचणी परिक्षा असल्याने पेपर देऊन ती परत येत असताना आरोपींनी मुलीला जबरदस्तीने पकडून जवळच असलेल्या चारीच्या पुलाखाली नेऊन तिच्यावर बलात्कार करून तिचा क्रूर पद्धतीने खून केला होता ! सहा वाजल्यानंतर मुलगी घरी न आल्याने तिचे आई-वडिल व वस्तीवरील ग्रामस्थांनी या मुलीचा शोध सुरू केली होती ! गावातील नातेवाईक, तिच्या मैत्रिणीच्या घरी पालकांनी मुलीबाबत विचारणा केली, परंतु मुलगी सापडली नाही. रात्री सातच्या सुमारास पिंपळगाव जोगा कॅनॉलच्या चारीच्या छोट्या पुलाखाली मुलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली. या प्रकारामुळे मुलीचे पालक, नातेवाइक सुन्न झाले होते. त्याच परिस्थितीत अज्ञात आरोपीविरुद्ध पारनेर पोलिस स्टेशनला बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, खून करणे, बलात्कार असा गुन्हा दाखल झाला होता ! तर दाखल गुंह्याच्या दोन दिवसातच पारणेर पोलिसांनी आरोपीना अटक केली होती ! त्यामध्ये संतोष लोनकर , मंगेश लोणकर आणि दत्तात्रय शिंदे या तीन आरोपीना अटक करण्यात आली होती ! दरम्यान आरोपी अटक जाल्यानंतर 18 नोहेंबर 2014 रोजी पोलिसांनी अहमदनगर कोर्टात चार्शिट दाखल केली होती ! तर 1 जुलै 2015 पासून या खटल्याची सुनावणी सुरू जाली होती ! व अखेर आज 7 नोहेंबर 2017 रोजी म्हणजेच तब्बल आज 4 वर्षा नंतर त्या पिडितेला न्याय मिळाला आहे !