मंत्रालयात सातव्या माळ्यावरून तरूण शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न -मंत्री येण्यास पावून तास उशीर

0
720

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – मंत्रालयाच्या अॅनेक्स इमारती मधील सातव्या मजल्याच्या सज्जावर चढून   तुळजापूर जि. उस्मानाबाद मधील आनंद उर्फ ज्ञानेश्वर साळवे या तरुण शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न करत होता. जोपर्यंत मुख्यमंत्री अथवा, कृषीमंत्री येत नाही तो पर्यंत मी खाली उतरणार नाही असे हा तरूण बोलत होता. सोयाबीन, कापसाचा भाव पडल्याने त्याला शेती मध्ये मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले होते.

संपूर्ण राज्याच्या कारभार ज्या मंत्रालयातून चालतो, जेथे मंत्र्यांच्या कॅबिनेट होतात, बैठक होतात, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार मध्ये “मी शेतकरी” असे म्हणणारे मंत्री या मंत्रालयात असताना सुद्धा एका शेतकऱ्यावर मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याची वेळ येते अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. दरम्यान या तरूण शेतकऱ्याचे प्राण वाचविण्यासाठी मंत्रालय परिसरात पोलीस अग्निशमन दल तैनात करण्यात आले होते. या तरूणाने हातात मोठी काच घेतली होती, मी येथूच आत्महत्या करेन असा इशारा तो देत होता. सरकारच्या वतीने शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, गृहराज्यमंत्री ( ग्रामिण ) दिपक केसरकर यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने या तरूणाने आत्महत्येचा निर्णय बदलला. अखेर तब्बल दिड तासाच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.


300 कोटी रूपये खर्च करुन खोट्या जाहिरात बनवुन स्वतःची पाठ थोपटुन घेणे, जनतेची दिशाभुल करण्याचे काम सरकार करीत आहे. पण आज उस्मानाबाद जिल्ह्यातील ज्ञानेश्वर साळवे या तरुणाने शेतमालाच्या भावा करीता कोणीही दखल घेत नसल्याने थेट मंत्रालयात येवुन सातव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या करण्याचे आंदोलन केल्याने सरकारच्या खोटारड्या पणाचे पितळ उघडे पडले त्यामुळे आता तरी शेतकर्‍यांना खरा न्याय द्यावा – विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे

<><><><>><><><>><><><><><><>


शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याकडे वारंवार लक्ष वेधल्यानंतरही सरकार दखल घ्यायला तयार नाही. सरकारच्या या नाकर्तेपणामुळेच शेतकऱ्यांचे आंदोलन थेट मंत्रालयापर्यंत धडकू लागले आहे. शेतमालाच्या कमी भावाकडे लक्ष वेधण्यासाठी तुळजापूरच्या शेतकऱ्याला मुंबईत येऊन मंत्रालयात आंदोलन करावे लागते, हे सरकारचे अपयश आहे. हमीभावावरून राज्यातील वातावरण स्फोटक झाले असून, सरकारने तातडीने भाव वाढवून न दिल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते – विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील