भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून कोणत्याही खेळाची निवड नाही – राष्ट्रीय खेळ म्हणून हॉकीची ओळख चुकीची

0
1118

पुणे – भारतात कुठल्याही खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा दिलेला नाही. मंत्रालयाने याविषयी कोणतीही अधिसूचना आजपर्यंत काढलेली नाही, हे धक्कादायक वास्तव भारताच्या राष्ट्रीय खेळाविषयी माहिती अधिकाराच्या अंतर्गत मागवलेल्या माहितीतून उघडकीस आले आहे. इयत्ता १२ वी मधील सत्यम सुराणा याने केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय यांच्याकडे माहिती मागवली होती.  आतापर्यंत भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून हॉकी या खेळाची दिली जाणारी ओळख चुकीची होते.