विश्‍वास नांगरे पाटलांनी हयगय केली असल्यास कारवाई : दीपक केसरकर

49

कोल्हापूर : सांगली येथील अनिकेत कोथळे खून प्रकरणात विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील व पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी हयगय केली असल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

श्री. केसरकर यांनी आज सांगलीला भेट दिली. तत्पुर्वी ते कोल्हापुरात अंबाबाई दर्शनासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांची भेट घेतली.