पंढरपूर शहर येथे जुगार आड्डायावर छापा –  10,71,368 /-रू मुद्देमालसह 14 आरोपींना घेतले ताब्यात

0
791
Google search engine
Google search engine

*सोलापूर:-*मा.पोलीस अधीक्षक श्री.विरेश प्रभू सर यांचेकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी पंढरपुर शहर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दि
12-11-2017 रोजी संध्याकाळी 16-00 वा चे सुमारास जुना कासेगाव रोड विवेक वर्धिनी शाळेजवळील संतोष लक्ष्मण कवठे याच्या राहते घरातील मन्ना नावाच्या जुगार अड्यावर छापा टाकून 1) दत्तात्रय ज्ञानेश्वर माने वय 54 वर्षे रा.जुनीपेठ 2) रावसाहेब बाबासाहेब मोरे वय 28 वर्षे रा.मुंडेवाडी 3) संतोष पांडुरंग कुलकर्णी वय 42 वर्षे , रा.भक्तीमार्ग 4) नेमीचंद करमदास राका वय 62 वर्षे रा. जुनीपेठ 5) सचिन ज्ञानदेव कदम वय 38 वर्षे रा. घोगडेगल्ली 6) शहाद अहमद इलाही पठाण वय 36 रा.संतपेठ 7) विठ्ठल उर्फ पांडू भिमराव अंकुशराव वय 30 वर्षे रा.घोगडेगल्ली 8) नरेश उत्तमराव आधटराव वय 27 वर्षे रा.इसबावी 9) अरूण बळीराम नागणे वय 51 रा. सिध्देवाडी 10) स्वप्निल प्रकाश टमटम वय 22 वर्षे रा. जुनीपेठ 11) दत्तात्रय मधुकर घाडगे वय 32 वर्षे रा. मुंडेवाडी 12) औदुंबर महादेव सुरवसे वय 46 वर्षे रा. संतपेठ 13) हनुमानदास रामविलास भट्टड वय 52 वर्षे रा. वांगीकर नगर 14) विशाल दत्ता खिलाटे वय 22 वर्षे रा. इसुनारायण झोपडपट्टी सर्व . पंढरपूर वरील आरोपींना मन्ना नावाचा जुगार कोणाकडे खेळत आहे याची विचारपुस केली असता त्याचे नाव 15) संतोष लक्ष्मण कवठे रा. पंढरपूर असे सांगितले. वरील इसमांना जुगार खेळतअसताना पकडून त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून सुमारे 10,71,368/- रू किमतीचा रोख रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरील सर्व आरोपी याचेविरूद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रसंगी मा. पोलीस अधीक्षक श्री विरेश प्रभू सर यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील पोसई जी एच निंबाळकर सर , पो.कॉ, श्रीकांत जवळगे, सिध्दाराम स्वामी,विलास पारधी, अक्षय दळवी पोकाॅ पांडुरंग केंद्रे , अमोल माने ,यांच्या टिमने हे काम केले आहे.