व्यापाऱ्यांनी शेती माल उपबाजार समितीत खरेदी करावा – माजी आमदार डॉ श्री अविनाश वारजूकर

0
1136
Google search engine
Google search engine

नेरी येथे उप बाजार केंद्रात काटा पूजन व खरेदी विक्री चे शुभारंभ

चिमूर / महेश कोडापे –

शेतकऱ्यांचा शेती पीक माल निघणे सुरु झाला असून शेतकऱ्यांनी कोणत्याही फसवा फसवी पासून दूर राहून आपला शेत माल योग्य भावात खरेदी होईल यासाठी उप बाजार समितीतीत आणावे जेणेकरून फसवणूक होणार नसल्याचे सागत माजी आमदार डॉ अविनाश वारजूकर पुढे म्हणाले की भाजप सरकार हे शेतकरी विरोधी असून शेती माल ला हमी भाव हा त्यांनी दिलेल्या घोषणे पेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून आनलाईन किचकट अडचणी मुळे शेतकऱ्यांना त्रास होत असल्याचे सांगितले.

नेरी येथील खरेदी विक्री शुमारंभ व काटा पूजन कार्यक्रमात माजी आमदार डॉ अविनाश वारजूकर बोलत होते यावेळी जी प गट नेते डॉ सतिश वारजूकर ,पस गट नेते रोशन ढोक, पस सदस्य लता पिसे, उप सभापती नंदू गावनडे, राम राऊत, संजय डोंगरे,ओम खैरे,सरपंच रामदास सहारे,संचालक अनिल वनमाळी, देवीदास मोहिणकर, धर्मु शिरभैय्ये संदीप पिसे ,शंकर घरत इतर संचालक आदी उपस्थित होते दरम्यान तीन शेतकऱ्यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करन्यात आले दरम्यान यावेळी जी प गट नेते डॉ सतीश वारजूकर प्रा राम राऊत ,संजय डोंगरे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक सभापती माधव बिरजे यानी केले संचालन रवींद्र पंधरे व आभार काशिवार यांनी व्यक्त केले यावेळी बाजार समिती चे सचिव ढोने व्यापारी ,अडते, मापारी ,हमाल व शेतकरी उपस्थित होते.