वाठोडा शुक्लेश्वर येथील विजवितरण कार्यालयाचा भोंगळ कारोभार  -कनिष्ठ अभियंता १५ दिवसापासून गैरहजर @MSEDCL  @cbawankule @CMDMSEDCL

0
718
Google search engine
Google search engine

—————————————————–

कार्यालयाचा कारोभार चालतोया वायरमनच्या भारोशावर

—————————————————–प्रतिनिधी – गजानन खोपे –

वाठोडा शुक्लेश्वर :-

भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील वीज वितरण कंपनी चा कारभार सध्या पुर्णत :ढेपाळला आहे, येथील कनिष्ठ अभियंता गेल्या १५ दिवसापासून कार्यालयात गैरहजर असून वायरमनच्या भरवशावर येथील कामकाज सुरु आहे,या भोंगळ कारभाराचा नाहक त्रास परिसरातील सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे, कनिष्ठ अभियंता गैरहजर असल्याने वीज ग्राहकांची अनेक कामे रखडली आहेत, चुकीच्या रिडिंगमुळे आलेली अवास्तव बिले दुरुस्ती करून घेण्यासाठी वीज वितरण कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांना तसेच परतावे लागत आहे, वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर ग्राहकांना कार्यालयात मध्ये जावे लागते, तेव्हा तेथे कुणी ही कर्मचारी हजर नसते ही नेहमीची बाब झाली आहे, दोन ते तीन तास कर्मचाऱ्यांची वाट पाहत बाहेर हॉल मध्ये बसावे लागते, त्यानंतर तक्रार दखल करूनही वीज पुरवठा केव्हा सुरळीत केला जाईल याबाबत कुठल्याही शाश्वती नसते ग्राहकांच्या तक्रारी व सुरळीत वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याबाबत वाठोडा शुक्लेश्वरचे वीज कार्यालयामध्ये कर्मचारी गैरहजर असल्याने ग्राहकांना मध्ये असंतोष निर्माण झाला आहे, गावातील नागरिक श्री आशीष भडके, श्रीकुष्ण मांगुळकर, सुनील वाठ .या ग्राहकांना मीटर रिडींग प्रमाणे बिल देण्यात येत नसल्याने आठ दिवसापासून कार्यालयाच्या चकरा मारत आहेत, पण त्याची तक्रार स्वीकारायला कार्यालयात कोणी ही अधिकारी किंवा कर्मचारी उपलब्ध झाला नाही.अशावेळी तक्रार कराची तर कोणाकडे असा प्रश्न त्यांनी उपस्थिती केला आहे, वाठोडा शुक्लेश्वर हे गाव १५ हजार लोक संख्या असल्याने तालुक्यातील एक मोठे गाव आहे, तरीही येथे एकही कर्मचारी मुख्यालयात हजर राहत नसल्याचे चित्र दिसून येत आहे, येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्याचे कुठले ही नियंत्रण नसल्याने येथील मनमानी कारोभार सुरू असल्याचा आरोप गावकंऱ्यानी केला आहे,