*महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानीत शाळा कृति समितीच्या आझाद मैदान, मुंबई येथील बेमुदत धरणे आन्दोलनास शेखर भोयर यांची भेट*

0
1146
Google search engine
Google search engine

———————————————-
*शिक्षक महासंघाने दिला विनाशर्त पाठीम्बा*
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸

मुंबई –
महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानीत शाळा कृति समितीच्या वतीने आझाद मैदान, मुंबई येथे आयोजित बेमुदत धरणे आंदोलनास शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी आंदोलन स्थळी जाऊन भेट दिली.
यावेळी औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री.विक्रमजी काळे साहेब, नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार श्री.सुधीरजी तांबे साहेब, कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री.बाळाराम पाटिल साहेब व आमदार श्री.दत्तात्रय सावंत साहेब उपस्थित होते.यावेळी उपस्थित सर्व आमदारांनी तसेच शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी या आंदोलनास पाठीम्बा दिला.
यावेळी येणाऱ्या नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात विना अनुदानीत शिक्षकांचा प्रश्न सभागृहात उठविनार असल्याचे मत औरंगाबाद शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री.विक्रमजी काळे साहेब यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे अनुदानाच्या बाबतीत मा. मुख्यमंत्री यांची वेळ मागवून चर्चा करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
विना अनुदानीत शिक्षकांवर अन्याय होत असुन हा प्रश्न येणाऱ्या अधिवेशना दरम्यान न सुटल्यास भविष्यात सर्व संघटना यांना एकत्रित करुण व्यापक महाराष्ट्रभर शाळा बंद आंदोलन करणार असल्याचे आश्वासन औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री.विक्रमजी काळे साहेब यांनी दिले आहे.
याप्रसंगी विना अनुदानीत शिक्षक बांधवांना न्याय मिळेपर्यंत शिक्षक महासंघ खंबीरपने त्यांच्या पाठीशी उभा असल्याचे मत शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी व्यक्त केले.