राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांचे नेतुत्वात अठरा मागण्याचे श्री शरद पवार यांना निवेदन

0
723
Google search engine
Google search engine

चंद्रपूर :-

राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हा शाखा चंद्रपूर तर्फे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष यांना चंद्रपूरच्या दौऱ्यावर असताना आज १६ नोव्हेंबर २०१७ ला निवेदन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांचे नेतुत्वात अठरा मागण्याचे निवेदन देण्यात आले. ओबीसी समाजाची जणगणना घोषित करून केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी.मंडल आयोग , नाच्चीपण आयोग , स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात याव्या.ओबीसींना लावण्यात आलेली क्रिमीलेअरची अट रद्द करण्यात यावी.

भारत सरकार स्कॉलरशिप १००% देण्यात यावी.तहसील व जिल्हास्तरावर स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था करण्यात यावी.ओबीसी विधार्थाना स्वाधार योजना सुरु करण्यात यावी.ओबीसी विधार्थासाठी UPSC व MPSC चे मोफत प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात यावे.महारष्ट्र सरकारने सुरु केलेली शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना क्रिमीलेअरच्या मर्यादित करण्यात यावी.राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा देण्यात यावा.

ओबीसी समाजाचे चंद्रपूर ११, गडचिरोली ६,यवतमाळ १४ , नंदुरबार धुळे ठाणे , नाशिक व पालघर ९ टक्के या जिल्हातील वर्ग ३ ए ४ च्या पदभरती मध्ये सन १९९७ पासून कमी झालेले आरक्षण पूर्वरत करण्यात यावे.ओबीसी समाजाचा अॅटासिटी कायद्यामध्ये समावेश करण्यात यावा.तहसील न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालायापार्यत सर्व न्यायीक स्तरावर ओबीसींना आरक्षण लागू करण्यात यावे.

ओबीसी शेतकर्यासाठी वनहक्क पट्ट्यासाठी लावलेली तीन पिढ्याची अट रद्द करण्यात यावी.ओबीसी सामाजासाठी लोकसभा व विधानसभासाठी स्वतंत्र मतदार संघ स्थापन कारण्यात यावे यावे.सार्वजनिक उपक्रमाचे होत असलेले खाजगीकरण बंद करण्यात यावे.केंद्र व राज्य सरकारी कार्यालयातील ओबीसी संवर्गातील रिक्त पदे भरण्यात यावी व त्यासाठी सक्तीचा कायदा करण्यात यावा.ओबीसी शेतकर्यांना १००% सवलतीवर केंद्रात व राज्यात योजना सुरु करण्यात याव्यात.ओबीसी शेतकरी ,शेतमजूरांना वयाच्या ६० वर्षानंतर पेन्शन योजना लागू करण्यात यावी.इत्यादी मागण्याचे निवेदन देण्या करिता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव फंड, प्रा रवी वरारकर , बाळकृष्ण भगत , प्रवीण चवरे, रवींद्र टोंगे, उपस्थित होते