जिल्ह्यातून शेंदूरजनाघाट नगर परिषदेला उत्कृष्ट नगर पालिकेचे प्रथम पारितोषिक -मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान.

0
639
Google search engine
Google search engine
अमरावती / मुंबई  :- 
नगर विकास दिनानिमित्य अमरावती जिल्ह्यातून शेंदूरजनाघाट नगर परिषदेला उत्कृष्ठ नगरपालिका (“क” वर्ग ) २.५० कोटी रुपयाचे प्रथम पारितोषिक राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मोर्शी-वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे, शेंदूरजनाघाटचे नगराध्यक्ष रुपेश मांडवे, मुख्याधिकारी श्री.संजीव ओहळ यांनी पुरस्कार स्वीकारला.
     स्थानिक संस्थांनी त्यांच्या क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास होण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्नशील राहून, विकास आराखड्यानुसार सार्वजनिक सोयी-सुविधांची आरक्षणे विकसित करणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रातील नागरिकांना पिण्याचे पाणी, स्वच्छ व चांगले रस्ते, दिवाबत्ती, सांडपाण्याचा निचरा इत्यादी मुलभूत सुविधा चांगल्या प्रकारे देणे, हे या नागरी स्थानिक संस्थांचे कर्तव्य असते. राज्यातील नगरपरिषद आपल्या शहरातील नागरिकांना चांगल्या प्रकारे सेवा देऊन त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या कामांचा नियमितपणे आढावा घेऊन त्यांचा गुणगौरव व प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना सेवा-सुविधा पुरविण्यासंदर्भात निकोप स्पर्धा निर्माण व्हावी व पर्यायाने त्यांच्याकडून उत्कृष्ट कामगिरी व्हावी. या हेतूने नगर विकासाच्या दृष्टीने ज्या नगरपरिषदा नागरिकांना विविध प्रकारच्या चांगल्या अत्यावश्यक सेवा-सुविधा नगरपरिषदेच्या माध्यमातून देतात, त्या नगर परिषदांचा गुणगौरव व्हावा, या दृष्टीकोनातून विभागामार्फत दरवर्षी “नगर विकास दिनानिमित्य उत्कृष्ट काम करणा-या नागरी स्थानिक संस्था व त्यांना सातत्याने प्रोत्साहन व गुणगौरव करण्यात येते. या पुरस्काराकरिता नगरपरिषदांनी त्यांचे प्रस्ताव / नामांकने आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांचेकडे दरवर्षी दिनांक ५ एप्रिल पर्यंत सादर करावे लागते.
        अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजनाघाट नगर पालिका हि “क” वर्ग दर्जाची नगर पालिका आहे. नगर परिषद शेंदूरजना घाटने संपूर्ण शहर हागणदारी मुक्त केले, शहरातील अंतर्गत रस्ते स्वच्छ व सुंदर शहर घडविण्यात नगर परिषद व शहरवासीयांनी महत्वाचे योगदान घेतले.  यावेळी रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांचे हस्ते मोर्शी-वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे, शेंदूरजनाघाट नगर परिषदेचे नगराध्यक्ष रुपेश मांडवे, मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी पुरस्कार स्वीकारला.