सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने धरणे धरुन जिल्हाधिकारी याना निवेदन सादर

0
1098
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी/प्रतिनिधी-

पत्रकारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकांराच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.पत्रकार पेन्शन योजना,छोट्या वृत्तरतपत्रांची मुस्कटदाबी,पत्रकार संरक्षण कायदा अशा अनेक प्रश्नांसंदर्भात आज धरणे धरण्यात आले.यानंतर एक निवेदन जिल्हाधिकाऱयांमार्फत मुख्यमंत्र्याना देण्यात आले.
जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी संघाचे अध्यक्ष गजानन नाईक,उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन,दिलीप खडपकर,काका करंबेळकर,दैनिक रणझुंझारचे संपादक मनोहर कालकुंद्रीकर यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.

पत्रकारांना पेन्शन योजना सुरू करण्यासाठी शासनाचे धोरण अद्याप ठोस नाही,द्वैवार्षिक तपासणीच्या नावाखाली छोट्या वृत्तपत्रांची मुस्कटदाबी केली जात आहे तसेच त्यांना शासनमान्य यादीवरून काढून टाकण्याचा घाट घातला जात आहे.पत्रकार संरक्षण कायद्याबाबतही काहीशी तशीच परिस्थिती आहे.या सर्व पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेच्या सुचनेनुसार आज संपूर्ण राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.यानंतर मागण्यांचे एक निवेदन जिकल्हाधिकाऱयांना देण्यात आले.
यावेळी संघाच्या सहसचिव देवयानी वरसकर,जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे,गिरीश परब,विजय गावकर,अमोल टेमकर, नंदू आयरे,गुरू दळवी,विनोद दळवी,नाना बोगार,संतोष राऊळ,भगवान लोके आदी पत्रकार उपस्थित होते.