उद्योगभारती तर्फे जानेवारी मध्ये “सिक्कीम राज्याचा सेंद्रिय शेती कृषी अभ्यास दौऱ्याचे आयोजन”. १५ ऑक्टोबर २०१७ ते १५ डिसेंबर २०१७ पर्यंत प्रवेश नोंदणी

0
1522

 

 

राज्य कृषि पदवीधर संघटनेच्या उद्योगभारती या सुपरिचित उद्योजकता प्रशिक्षण विभाग तर्फे जानेवारी २०१८ मध्ये सिक्कीम राज्याच्या सेंद्रिय शेतीच्या कृषि अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. इस्राईल कृषि अभ्यास दौर्यां सह इतर देशांचे तांत्रिक कृषि अभ्यास दौरे यशस्वी रित्या आयोजित करणारी संस्था म्हणून उद्योगभारतीने राज्यात अल्पावधीत नावलौकिक मिळवला आहे. रासायनिक शेतीला उत्तम पर्याय म्हणून बहुसंख्य शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत, पण सेंद्रिय शेती बाबत योग्य मार्गदर्शन शेतकरी बांधवांना लाभत नाही त्या मुळे सेंद्रिय शेती करण्यास शेतकरी पुढे येत नाहीत त्या मुळेच हि उणीव भरून काढण्या करता या पुढे सातत्याने असे उपक्रम संस्थे कडून आयोजित केले जात असल्याची माहिती उद्योगभारती चे संचालक श्री.कडूस पाटील यांनी दिली.

दिनांक १५ ऑक्टोबर पासून दौऱ्याची नोंदणी सुरु झाली असून, १७ डिसेंबर २०१७ पर्यंतच हे प्रवेश सुरु राहतील. प्रवेश करता वयाची आणि शिक्षणाची अट नाही. पासपोर्ट ची अथवा कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. अनेक युवा शेतकरी व सेंद्रिय शेतीच्या चळवळीतील कार्य करणाऱ्यांच्या मागणी नुसार हा दौरा आयोजित केल्याची माहिती कार्यक्रमाचे समन्वयक श्री. प्रणव टोम्पे पाटील यांनी दिली. दौऱ्याच्या खास बाबी वर बोलताना ते म्हणाले कि,या दौऱ्यात सेंद्रिय आले लागवड, फळबागेचे व्यवस्थापन,बेबी कॉर्न सारखी पिके, सिक्कीम राज्याचा सेंद्रिय शेती धोरणाचा अभ्यास, सिक्कीम मधील शेतकरी व उद्योजकांसमवेत प्रत्यक्ष भेटी चर्चासत्रे, शिवार फेरी, बिझनेस नेटवर्किंग, तसेच सिक्कीम च अद्भुत निसर्ग सौंदर्य पाहणे, याक सफारी, चायना बॉर्डर भेट,सिक्कीम ची संस्कृती पाहण्याची संधी अभ्यासकांना प्रशिक्षणार्थ्यांना यात मिळणार आहे. मुंबई ते बागडोगरा विमान प्रवासाचा आनंद शेतकऱ्यांना सिक्कीम अभ्यास दौऱ्यात लुटता येईल. गंगटोक मधील सेंद्रिय आल्याची लागवड, भाजीपाला, इतर काही स्थानिक पिके, बेबी कॉर्न, त्यावर प्रोसेसिंग करणाऱ्या कंपन्या, इत्यादी गंगटोक मधील समाविष्ट बाबी असतील. याच बरोबर पश्चिम पेंडम, र्हेनॉक, रांगपो, हा प्रदेश पाहणे व तेथील कृषि अभ्यास समाविष्ट आहे.

३७८० मीटर्स उंचीवर वसलेले आणि ५० फूट खोल प्रसिद्ध त्सांगो तळे व बाबा रॅम मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने दौऱ्यात समाविष्ट आहे.रावांगला परिसरातील चहाचे मळे, विलायची, स्थानिक पिकांचा अभ्यास प्रशिक्षणार्थ्यांना करता येईल. पेलिंग, यूसोन्ग, बोरॉन पोलॉक इथे ग्राम अभ्यास प्रस्तावित आहे. मंगलाबारी इत्यादी प्रदेशांचा सेंरीय शेतीचा अभ्यास प्रस्तावित आहे.

 

 

परतीचा प्रवास सुद्धा विमानानेच केला जाणार आहे. या दौऱ्यात नाश्ता, जेवण, चहा, या बाबींचा वेगळा अथवा कोणताही छुपा खर्च नसेल. प्रवेश फी मध्ये सर्व बाबी समाविष्ट असून, द्वि तारांकित निवास व्यवस्था व भोजन व्यवस्था असेल. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रमाणपत्र प्रशिक्षणार्थ्याला दिले जाईल.

सेंद्रिय शेतीचा विस्तार आता वेगाने होत असून, सेंद्रिय उत्पादन बाबत जागरूकता कमालीची वाढलेली आहे. या अनुषंगाने दौऱ्यात अतिशय चांगला प्रतिसाद असून मुंबई,कोकण,पुणे,नाशिक,सातारा या भागातून युवक शेतकरी,उद्योजकांनी प्रवेश नोंदणी केली आहे असे समन्वयक टोम्पे पाटील यांनी सांगितले. दौऱ्यात मार्गदर्शक समन्वयक प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असून या दौऱ्यास कोणते हि शासकीय अनुदान नाही. संपूर्ण सात दिवसांचा हा अभ्यास दौऱ्यात सेंद्रिय शेतीचे ज्ञान व पर्यटना चा आनंद मिळवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्काचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

संपर्क – 7030713713 , 8237572315

इ मेल – agrigraduatesassociation@gmail.com

वेबसाईट – www.agriandgraduates.org