पृथ्वीवर समतोल राखण्यासाठी शहापूरात वृक्ष लागवड-श्रमदानात आमदार डॉ. अनिल बोंडे यांची उपस्थिती

0
789
Google search engine
Google search engine

वरुड : 

जरुड पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या शहापूर येथील नागरिकांनी पृथ्वीवर समतोल कायम ठेवण्यासाठी सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन शहापूर येथे मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.
        यावेळी वरुडचे तहसीलदार आशिष बिजवल, मातोश्री त्रिवेणी बोंडे महिला सूतगिरणीच्या अध्यक्षा डॉ.सौ.वसुधाताई बोंडे,प.स.सदस्या अंजली तुमराम पाणी फाउंडेशनचे अतुल काळे, बिडीओ सुभाष बोपटे, दीपक गणेशे तसेच शहापूर येथील रोजगार सेवक दुर्गेश धुर्वे,मंगेश तितरे, निलेश शेंडे, शैलेश बेदोरकर, दीपक बिजवे, गुणवंत वाघ, आकाश मसराम, दिगांबर कोल्हे, किशोर उईके, छाया धुर्वे, सुनिता उईके, सुलोचना गंडलीग, जयश्री धुर्वे, सुनिता बावणे, दिनेश नायक, वसंता उईके, शोभा ठाकरे, शहंशाज परवीन, सौ.मीना शहाणे, सुनिता राजू ऊईके,रेखा हरले, मथुरा सिरराम, भाग्यश्री धुर्वे, (सरपंच) चैतराम कुमरे, मंदुर खान, सचिव बी.आर. कांबळे, आशा सिनकर, फरीदाबी आवेद खान, रेखा धोटे, रिजवान बानो, पंडित नहरूपी, संदीप डबरासे, प्रज्वल बावणे, शुभम उईके यांच्यासह आदी मान्यवर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.