एकिकडे लोडशेंडीग दुसरीकडे विद्युत देयकात वाढ ग्राहकांची लुट जनप्रतीनीधी मात्र चुप *वाढत्या तापमानात दुपारी अडीच वाजेपर्यंत लोडशेडींग*

0
1145

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /–

महाराष्ट्र लोडशेडींग मुक्त करू अशा घोषणा देवून महाराष्ट्रात आपली सत्ता स्थापन करून भाजप सरकारने जनतेची दिशाभुल केली आहे.आज सत्तेवर येवून कित्येक दिवस झाले पण लोडशेडींग मात्र महाराष्ट्रातील जनतेचा पिच्छा सोडत नाही.एन उन्हाळ्यात दुपारी अडीच वाजेपर्यंत लोटशेडींग जनतेच्या आयुष्यासोबत जिवघेणा खेळ महावितरण करीत आहे.
      भर उन्हाळ्यात सकाळपासूनच दुपारपर्यंत भारनियमन करून जनतेचे हाल महावितरण करीत आहे.एकिकडे विद्युत देयकात भरमसाठ वाढ तर दुसरीकडे चार ते पाच तासांचे भारनियमन यामुळे जनतेवर आर्थिक भुर्दंडासोबत उन्हाच्या झळा सोसून आरोग्याची सुध्दा चिंता महावितरणने निर्माण केली आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने महाराष्ट्र भारनियमन मुक्त करू असे आश्वासन जनतेला देवून आपल्या पदरात बहुमत पाडून सत्ता प्राप्त केली.सत्ता मिळवून आज अनेक दिवस होवूनही हे आश्वासन तर पुर्ण केले नाही उलट राज्यातील ज्या शहरात भारनियमन नव्हते तेथे सुध्दा सुरू करून दिले.अमरावती जिल्ह्यातील अचलपूर हे अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते या शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेची बाब म्हणून 2016 मध्ये सर्व धर्मीय व पक्षीय जनता एकत्र येऊन एक दिवस अचलपूर कडेकोट बंद ठेवून रस्त्यावर उतरून तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देवून हे भारनियमन बंद केले होते त्यानंतर या शहरात भारनियमन कायमचे बंद करण्यात आले मात्र आता गेल्या काही दिवसांपासून पुन्हा सकाळपासूनच दुपारी एक किंवा अडीच वाजेपर्यंत तर संध्याकाळी सुध्दा भारनियमन सुरू करण्यात आले आहे यामुळे जनतेला उन्हाच्या त्रास सहन करावा लागतो आहे तसेच संध्याकाळी भारनियमन मुळे पुन्हां सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे याकडे जनप्रतिनीधीचे सुध्दा दुर्लक्ष असल्याचे बोलल्या जात आहे.याबाबत महावितरणने त्वरित लक्ष देऊन अचलपूर शहरातील हे अवास्तव भारनियमन बंद करावे अन्यथा पुन्हां सर्व पक्षीय व धर्मीय जनतेला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल अशी जनतेची मागणी आहे.