रस्त्यावरील खड्डे 15 डिसेंबर पर्यंत बुजवावे- श्री चंद्रकांत पाटील   <●> बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक

0
1627
Google search engine
Google search engine

वर्धा – रस्ता बांधकामाच्या कामात जो अधिकारी चुका करेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल तर चांगले व खड्डेमुक्त रस्ते तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांचा बक्षिस आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येईल . अधिका-यांनी 15 डिसेंबर पर्यंत रस्त्यावरील खड्डे भरावे तसेच हिंगणी-हिंगणा- वर्धा हा रस्ता पूर्णपणे सिलकोट करण्याच्या सुचना राज्याचे बांधकाम व महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेत. सामाजिक न्याय भवन येथे सार्वजनिक बांधकाम मंडळ चंद्रपर अंतर्गत वर्धा जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा घेताना त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. .

यावेळी बैठकिला मुख्य अभियंता उल्हास देबडकर, अवर सचिव सुनिल करमरकर, उप सचिव फु.स.मेश्राम, कार्यकारी अभियंता उज्वल मेहता, अधिक्षक अभियंता ङिके.बालपांडे, कार्यकारी अभियंता शरद चौधरी, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. तेलंग उपस्थित होते.

खड्डे भरण्याचे काम करण्यासोबच ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात खड्डे पडले असतील अशा ठिकाणी सिलकोट देण्यात दयावा. तसेच रस्ता खड्डे भरण्याच्या पलिकडे असलयास नव्याने रस्त्याच्या कामांचा प्रस्ताव सादर करावा. यासाठी प्रत्येक जिल्हयाला आवश्यक निधी मंजुर करण्यात येत असून या निधीतून कामे करावीत . हिंगणी –हिंगणा-वर्धा महामार्गावरील रस्त्यावर पूर्ण सिलकोट देण्याच्या सुचनाही यावेळी श्री. पाटील यांनी केल्या.
राज्यातील सर्व जिल्हयामध्ये खड्डे भरण्याची कामे सुरु असून 35 टक्के कामे पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. याकामासाठी मंत्रालयातील एका अधिका-यांची प्रत्येक जिल्हयासाठी समन्वयक म्हणुन नियुक्ती करण्यात आलेली असून वर्धा जिल्हयासाठी फु.स.मेश्राम हे अधिकारी काम पाहणार आहे. हे अधिकारी कामाची पाहणी करुन कामाबद्दल सुचना , मार्गदर्शन करुन मंत्रालयाशी समन्वय साधाणार आहे . विभागांनी चांगल्या कंत्राटदारांकडून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने कामे पूर्ण करुन घ्यावीत, अशा सुचनाही यावेळी केल्या.
चांगले काम करणा-या अधिकां-याना बक्षिस देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांनी चांगली कामे केल्याबाबत सबंधित ग्रामपंचायत किंवा तेथील जेष्ठ नागरिकांचे प्रमाणपत्र दयावे लागेल.
रस्ता बांधकासाठी जिल्हयाला प्राप्त झालेल्या योजनेत्तर निधीतून 50 टक्के निधी नविन मंजूर कामाच्या दुरस्तीवर खर्च करावा. तसेच 50 टक्के निधी सन 2014 ते 2017 मधील प्रलंबित कामे व जी कामे झाली आहेत, मात्र पैसे दिले नाही अशा कामावर खर्च करावा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी मंत्रीमहोदयानी प्रकृती व सामाजिक जीवनाकरीता हसत खेळत सूचना केल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना काम करतांना येणा-या समस्या मंत्री महोदयासमोर विषद केल्या यावर त्यांनी समर्पक सूचना , उपायोजना व त्याची अमंलबजावणी बाबत मार्गशदर्शन केले. अभियंत्यांनी राज्यभर दौरा करुन प्रत्यक्ष संवाद साधाणा-या मंत्रीमहोदयाचे आभार व्यक्त केले.
बैठकिला जिल्हयातील विभागीय अभियंता, शाखा अभियंता उपस्थित होते.