*प्रार्थना व स्वच्छता अभियान याचे महत्व पटवून देण्याचे दृष्टीने तरूणभारत वृत्तपत्र समुहाच्या उत्कृष्ठ ऊपक्रमाचा समारोप*

0
561
Google search engine
Google search engine

अचलपूर: / श्री प्रमोद नैकेले/-

आज स्वच्छता मोहीम सर्वत्र देशात सुरू आहे.महात्मा गांधी यांच्या स्वच्छता या मुलमंत्राचा आदर करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप दिले.या अनुषंगाने तरूणभारत वृत्तपत्र समूहाने स्वच्छते सोबत प्रार्थना ही संकल्पना मांडून स्पर्धेचे स्वरूप देवून प्रो.राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरी यांचे सहयोगाने एक उपक्रम हाती घेतला व त्याचा अमरावती जिल्ह्याचा समारोप स्थानीक ब्राम्हणसभा मंगलकार्यालय येथे संपन्न झाला.
आज स्वच्छता किती महत्वाची आहे ही गोष्ट जवळपास सर्वांचे लक्षात आले परंतू हि संकल्पना बालमनात रुजली पाहिजे जेणेकरून स्वच्छता एक अभियान नसुन आपली मुलभुत गरज आहे असे उद्दिष्ट समोर ठेवून तरूणभारत वृत्तपत्र समूहाने एका स्पर्धेचे आयोजन केले यासोबत आपण शैक्षणिक कार्य पार पाडतांना विविध प्रार्थना म्हणतो परंतू त्यांचा अर्थ आपल्याला माहिती नसतो याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून स्वच्छतेसोबत प्रार्थनेचे महत्व पटवून देण्याचे दृष्टीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत महाराष्ट्रातून असंख्य बालकांनी सहभाग घेतला त्यांनी वृत्तपत्रांतून प्रकाशित झालेल्या कात्रणाचे संकलन करून चिकटवही मध्ये उत्कृष्ठ सजावट केली तसेच या दरम्यान विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या अभियानाच्या अमरावती जिल्हा विभागाचा समारोप स्थानीक ब्राम्हणसभा कार्यालय येथे घेण्यात आला याप्रसंगी निवडक साहित्याचे प्रदर्शन सुध्दा लावण्यात आले होते असंख्य विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष व-हाडी कवी राजाभाऊ धर्माधिकारी,प्रमुख अतिथी प्रा.राम खवसे,श्यामजी पेठकर संपादक, उमाशंकर लालजीसाहेब,अक्षराताई लहाने यांनी आपले विचार मांडले तसेच कार्यक्राचे प्रास्ताविक निरज दुबे संचलन जिल्हा प्रतिनिधी गिरिश शेरेकर तर आभार परतवाडा प्रतिनिधी मनिष जहांगीरदार यांनी केले विजेत्यांना प्रशस्ती प्रमाणपत्र व बक्षीस वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सतीश आकोलकर,प्रविण मेटकर,गुप्ता व सर्व अमरावती तरूणभारत वृत्तपत्र समूहाने प्रयास केला.तसेच जुळ्या शहरातील वयोवृद्ध तरूण भारत वृत्तपत्र प्रमुख वितरक कैलाशजी उर्फ भायजी रावत यांच्या अविरत सेवेबद्दल सत्कार करण्यात आला.