सार्वजनिक बुध्द जयंती महोत्सवानिमित्त शहरात विविध कार्यक्रम

0
911
Google search engine
Google search engine



महेंद्र महाजन जैन /  रिसोड –

वाशीम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने येत्या बुधवार, 10 मे रोजी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात सार्वजनिक बुध्द जयंती महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता धम्मध्वजारोहण व धम्मवंदना होईल. त्यानंतर दहा वाजता विविध मान्यवरांचे मार्गदर्शन व बक्षीस वितरण समारंभ आयोजीत करण्यात आला आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत यवतमाळचे प्रसिध्द प्रबोधनकार शाहीर रमेशबाबु वाघमारे व ख्यातनाम गायीका वैशाली कांबळे यांच्या ‘भिमयुगाची ललकार’ या बुध्द भिमगितांचा बहारदार कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात उत्कृष्ट समाज प्रबोधन करणार्‍या तीन मंडळांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रोत्साहनपर स्मृतीचिन्ह देवून सन्मानीत करण्यात येईल. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयकुमार चक्रे, महावितरणचे कार्यकारी अभियंता विजय मेश्राम, तहसिलदार बळवंत अरखराव यांची उपस्थिती राहील. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये   बि.डी. अढागळे, अन्नपुर्णाताई कंकाळ, हरिश्‍चंद्र पोफळे, डॉ. सिध्दार्थ देवळे, डॉ. नरेश इंगळे, डॉ. सुशांत तायडे, डॉ. वैशाली देवळे, डॉ.अलकाताई मकासरे, सरकार इंगोले, जिवणे, ऍड.प्रशांत इंगळे, ऍड.सत्यानंद कांबळे, ऍड. मोहन गवई, ऍड. बिंबिसार बुक्तार, विजय मनवर, दिपक ढोले, पां. उ. जाधव, हंसिनी उचित, उषाताई अढागळे, मधुराणी बनसोड, प्रा.रामदास इंगळे, राजेंद्र साळवे, प्रा.नारायण पाईकराव, प्रा.अशोक ताजणे, विनय थोरात, रमेश भगत, मिलींद अरगडे, भालचंद्र तायडे, किसन निखाडे, कैलास तेलगोटे, ज्ञानेश्‍वर अडागळे, डि.एस. कांबळे, नागोराव उचित, ज्ञानेश्‍वर सुरवाडे, अनिताताई चंद्रशेखर, मनकर्णाबाई शिवाजी पडघान, सुशिलाबाई कांबळे, बेबी पडघाण आदी मान्यवरांची उपस्थिती राहील.
    या जयंती महोत्सवाला व कार्यक्रमाला समाजबांधव व नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार भिमराव कांबळे, सचिव तेजराव वानखडे, कार्याध्यक्ष मधुकर जुमडे, उपाध्यक्ष संजय इंगोले, डॉ. रमेश वानखेडे, अनंतराव तायडे, जग्गु राऊत, डॉ. सहदेव चंद्रशेखर, अनंतकुमार जुमडे, सुमित कांबळे, जय वानखडे, सुनिल कांबळे, संतोष वानखडे कोषाध्यक्ष अरविंद उचित, सहकोषाध्यक्ष शेषराव मेश्राम, प्रसिध्दी प्रमुख : विनोद तायडे, संजय खडसे, संतोष मोरे, प्रमोद खडसे, पप्पु घुगे, संदिप डोंगरे, दिपक खडसे, सदस्य बाळासाहेब सरकटे, राहुल इंगोले, अशोक किसनराव इंगळे, उल्हास इंगोले, बबनराव वाघमारे, भारत खडसे, भारत कांबळे, उज्वल खिल्लारे व प्रकाशक परमेश्‍वर अंभोरे यांनी केले आहे.