विहित वेळेत माहिती न देणे भोवले – राज्य माहिती आयुक्तांनी शिरजगाव बंड ग्रामपंचायत च्या सचिवाला ठोठावला 5000 रुपयांचा दंड – 3 दिवसात माहिती देण्याचे आदेश

0
622

बादल डकरे / चांदुर बाजार
चांदुर बाजार तालुक्यातील ग्रा प  शिरजगाव बंड येथे शशिकांत निचत प्रल्हादपूर यानि शी.बंड ग्रामपंचायत कार्यलाय यांच्याकडे 20-6-14 रोजी माहिती अधिकारात सन 12/13च्या आर्थिक वर्षाच्या फंडाची माहिती मागितली होती .कार्यलाय मार्फत 30 दिवसाच्या आत माहिती मिळाली  नाही कायद्याच्या तरतुदी नुसार निचत यांनी तत्कालीन गटविकास अधिकारी तथा प्रथम माहिती अपील अधिकारी यांच्या कडे प्रथम अपील दाखल केली या अपिलेवर प्रथम अपिलीत जनमाहिती अधिकारी उपस्थित नव्हते म्हणून  तत्कालीन प्रथम अपील अधिकारी यांनी दुसरी सुनावणी घेतली 29/10/14 रोजी दुसरी प्रथम अपील ची दुसरी सुनावणी घेण्यात आली.गटविकास अधिकारी यांनी अपील कर्त्यांना सात दिवसामध्ये  माहिती देण्यात यावे अशा  आदेश काढला.पण जन माहिती अधिकारी तथा सचिव शी बंड यांनी कोणत्याच प्रकारे माहिती पुरविली नाही.प्रथम अपिलात प्रकरणाचा निपटारा करण्याचे आदेश माहिती आयुक्त यांनी दिले आहे असे असताना माहिती न पुरविल्यामुळे अखरे शशिकांत निचत यांनी राज्य माहिती आयोगाकडे 14-11-14रोजी दुसरी अपील दाखल केली तरी याची सुनावणी 2-5-2017 रोजी  होती. या सुनावणी दरम्यान तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा सचिव मोरे यांना सन्माननीय राज्य माहिती आयुक्त,राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठ,अमरावती  यांनी  अंतरिम आदेश देत कलम ७(१) च्या भंग केल्यावरून अधिनियमाचे कलम २० (१)  नुसार त्यांना ५००० रुपयाचा दंड ठोठावला आहे तसेच सदर रक्कम विद्यमान प्रथम अपिलीय अधिकारी यांचेकडे आदेशानंतर ३० दिवसात रीतसर जमा करावी असेही म्हणण्यात आले आहे.तसेच ३ दिवसाचा आत  माहिती देण्याची ताकीद सुद्धा जन माहिती अधिकारी तथा सचिव  शी बंड यांना सन्माननीय आयुक्त यांनी दिली आहे. सदर  दंडामुळे चांदूर  बाजार पंचायत समिती कार्यलाय तसेच शहरात चर्चेला उधाण आले आहे.त्याच प्रमाणे शिरजगाव बंड या ठिकाणी सुद्धा हा विषय चव्हाट्यावर  आला आहे.