आज ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटी ची बैठक – श्री राहुल गांधी यांची कॉंग्रेस अध्यक्ष पदी होऊ शकते निवड

0
646
Google search engine
Google search engine

राहुल गांधी यांच्याविषयी 

  • राहुल गांधी यांचा जन्म 19 जून 1970 रोजी झाला.
  • सुरक्षेच्या कारणास्तव शालेय जीवनात राहुल गांधी यांची अनेकदा शाळा बदलण्यात येत होती.
  • त्यांनी पदवीचे शिक्षण भारताबाहेर घेतले. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची ओळख सार्वजनिक करण्यात येत नव्हती. केवळ ते ज्या महाविद्यालयात शिक्षण घेत होते तेथील निवडक पदाधिकारी आणि सुरक्षा संस्थांनाच त्यांची खरी ओळख माहिती होती.
  • कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यानंतर पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचा नेता म्हणून राहुल गांधी यांची ओळख आहे. त्यांची 2013 साली कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
  • राहुल गांधी हे उत्तर प्रदेशमधील अमेठी मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत.
  • राहुल गांधी यांनी 2014 सालच्या लोकसभा निवडणुकांसाठीच्या प्रचाराचे नेतृत्त्व केले. मात्र त्यावेळी पक्षाच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या पराभवाला कॉंग्रेसला सामोरे जावे लागले होते.