अजान इस्लामचा अविभाज्य घटक असला, तरी त्यासाठी भोंग्यांची आवश्यकता नाही ! – पंजाब-हरियाणा उच्च न्यायालय

0
580
Google search engine
Google search engine
चंडिगड – 
जेव्हा इस्लाम धर्माची स्थापना झाली, तेव्हा वीज आणि मायक्रोफोन (भोंगे) असे काहीही नव्हते. त्यामुळेच भोंगे हा मुस्लिम धर्माचा काही अविभाज्य घटक नाही, असे पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने म्हटले आहे. प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी काही दिवसांपूर्वी ट्वीटद्वारे मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात मत व्यक्त केले होते. यावरून त्यांच्या विरोधात आस महंमद यांनी पंजाब- हरियाणा उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने वरील निर्णय दिला. तसेच ही याचिका फेटाळून लावली आहे.
पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने म्हटले की, सोनू निगम यांनी अजानच्या विरोधात कोणतेही ट्वीट केलेले नाही, तर ते ट्वीट भोंग्यांच्या विरोधात होतेे. सोनू यांनी जे ट्वीट केले होते, त्यावरून त्यांना बळीचा बकरा बनवला जाण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे स्पष्ट दिसते. अशा प्रकारच्या प्रयत्नांना वेळीच आळा घालण्याची आवश्यकता आहे. संविधानानुसार एकता, बंधूभाव यांचे संरक्षण करणेही आवश्यक आहे.
अजान हा मुसलमानांच्या धर्माचा अविभाज्य घटक आहे. सकाळच्या प्रार्थनेमध्ये सगळ्यांना आमंत्रित करण्याचे भोंगा हे एक माध्यम आहे; पण म्हणून भोंगे मुसलमान धर्माचे महत्त्वपूर्ण घटक होत नाहीत, असे मत उच्च न्यायालयाने मांडले. उच्च न्यायालयाने हेही स्पष्ट केले की, सर्वोच्च न्यायालय किंवा अन्य न्यायालये यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या संदर्भात आतापर्यंत दिलेल्या निर्णयात जे शब्द वापरण्यात आले ते अजानसंदर्भात नसून भोंग्यांच्या संदर्भात होते. या शब्दांवरून कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत.