*कर्जामुळे शेतकऱ्यांची  विहीरीत उडी घेऊन आत्महत्या*

69

मूल/ चंद्रपूर –

जिल्यातील मूल तालुक्यात गांगलवाडी येथिल शेतकरी श्री परशुराम बोलमवार वय वर्ष 42 या शेतकऱ्याने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

मृतक शेतकरी श्री परशुराम बोलमवार याला तीन मुली, पत्नी व आई असा परीवार असुन अनु्क्रमे मोठी मुलगी 5 व्या वर्गात, 2 ऱ्या वर्गात व पहिल्या वर्गात आहे. त्याचाकडे दीड एकर शेती असून शेतीसाठी त्याने कर्ज घेतले होते.या मृतक शेतकऱ्याने 2008 – 2009 या वर्षात कर्ज घेतले होते अशी माहिती आहे. यावर्षी पाणी पाऊस नसून धानाला मावा,तुळतुळा,खोड किडी या रोगाने ग्रासले असून शेतकऱ्यांचे पिकही झाले नाही.

मूल तालुका अर्थमंत्री व जिल्हृयाचे पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांचे क्षेत्र असून त्यांचे क्षेत्रात शेतकऱ्यांची आत्महत्या होत असल्याने रोष व्यक्त केल्या जात आहे.