27 शिक्षकावर गुन्हे दाखल – निवडणूक कामाचे आदेश न पाळणे भोवले

0
627
Google search engine
Google search engine

यवतमाळ / राळेगाव :-

मतदार यादीच्या पुनरीक्षण कार्यक्रमावर बहिष्कार घालणाऱ्या रालेगांव तालुक्यातील जवळपास 28शिक्षकावर अखेर स्थानिक पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले महसूल विभागाच्या या कठोर कारवाईने जिल्हात खळबळ उडाली आहे.

गेल्या १५ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात मतदार यादयाचा पुनरीक्षणचे काम हाती घेण्यात आले परंतु राळेगाव विधानसभा मतदारसंघातिला शिक्षकांनी यावर बहिष्कार घातला यामुळे या शिक्षकावर गुन्हे नोंदविण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी श्री संदीपकुमार अपार यांनी तहसीलदार याना दिले यावरून राळेगाव तालुक्यातील शर्मिला फलटणकर ,विजय डोंगरे, व्हि एम भेंडे, गोविंद धोटे,अशोक खेकडे, सि जि कळसकर,आर जि बारहाते,राजुव दुरबडे या शिक्षकावर गुन्हे राळेगाव पोलिस स्टेशन मध्ये करण्यात आले.

त्याच्यावर कलम १३४,१८८ आदेशाचे पालन न करणे यावरून गुन्हे दाखल करण्यात आले पुढील तपास राळेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री संजय खंदारे करीत आहे.