नया अकोला येथे पशु संवर्धन शिबिर उत्साहात संपन्न

0
754

गजानन खोपे / वाठोडा शुक्लेश्वर :-

नया अकोला येथे पशु संवर्धन शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष श्री दत्ता ढोमने यांच्या अध्यक्षते खाली तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

शेतकरी पशु मालकाच्या हितासाठी अशा प्रकारचे शिबीर जिल्हाभर राबवु असे आश्वासन यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्ता ढोमने जि.प.सदस्य प्रकाश साबळे यांनी याप्रसंगी सांगीतले तसेच यावेळी पशु मालकाचा शाल श्रीफळ देऊन मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी पंचायत समिती सभापती वहिदाबी ईसुफ शाहा, नया अकोला ग्राम पंचायत सरपंच शाम देशमुख डी. एच. ओ. डॉ राहाटे, पशु मालक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.