महाराष्ट्रात ‘पद्मावती’ प्रदर्शित झाल्यास हिंदु समाज रस्त्यावर उतरेल ! – आमदार सुरेश भोळे

0
907
Google search engine
Google search engine

जळगाव –

 

चित्रपटाच्या माध्यमांतून होणारा हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान आम्ही कदापी सहन करणार नाही. याविषयी १६ नोव्हेंबरला मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊच नये, अशी विनंती केली आहे. पद्मावती चित्रपटातून हिंदूंच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत. जळगाव शहरात हा चित्रपट चालू देणार नाही. आता हिंदु समाज संघटित झाला असून महाराष्ट्रात पद्मावती प्रदर्शित झाल्यास हिंदु समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करील, अशी चेतावणी भाजपचे आमदार श्री. सुरेश भोळे (राजूमामा) यांनी दिली. या वेळी ‘पद्मावती चित्रपटावर समस्त हिंदूंनी बहिष्कार घालावा’, असे आवाहन आमदार श्री. सुरेश भोळे यांनी केले. २५ नोव्हेंबर या दिवशी महानगरपालिकेच्या इमारतीसमोर पद्मावती चित्रपटाच्या विरोधात घेण्यात आलेल्या आंदोलनामध्ये एकवटलेल्या ५१ हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पद्मावती चित्रपटाला जोरदार विरोध केला. केवळ जळगावमध्येच नव्हे; तर संपूर्ण महाराष्ट्रात पद्मावती चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा निर्धार या वेळी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी केला.

या आंदोलनानंतर शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाचे महानगरप्रमुख श्री. मोहन तिवारी यांनी धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी तक्रार स्वीकारली.