*राष्ट्रीय हायस्कूल येथे संविधान दिन मोठया उत्साहाने संपन्न*

0
2136
Google search engine
Google search engine

अचलपूर / विशेष प्रतिनिधी –

-26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतांचे संविधान लोकांना अर्पन करण्यात आले तो दिवस सर्वत्र संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो या अनुषंगाने आज स्थानीक राष्ट्रीय विद्यालयात संविधान दिन मोठया उत्साहाने संपन्न झाला.

याप्रसंगी वर्ग 5 ते 7च्या विद्यार्थ्यांना शाळेचे उपमुख्याध्यापक एस.डी.झंवर यांचे अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी बि.आर.नकाशे यांनी विद्यार्थ्यांना संविधान बाबत विस्तृत माहिती दिली तसेच अध्यक्षीय भाषणात झंवरसर यांनी डाँ.बाबासाहेब आंबेडकर व संविधान निर्मिती बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच वर्ग 8 ते 12 च्या विद्यार्थ्यांनी संविधान व त्यांचे महत्व या विषयावर निबंध लिहून व मुख्याध्यापक श्री प्रमोद नैकेले यांचे अध्यक्षतेखाली पर्यवेक्षक एम.एस.तिवारी मँडम यांनी विद्यार्थ्यांना संविधान विषयी सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाचे संचलन एस.आर.अग्रवाल व कैलाश बद्रटीये यांनी केले आभार महेश शेरेकर शिक्षक प्रतिनिधी यांनी मानले कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.