*कर्जमाफी योजनेचे नाव बदला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान थांबवा. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हाधिकाऱ्यांद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन*

0
756

अमरावती :-

कर्जमाफी योजनेचा बोजवारा उडाल्याने शेतकऱ्यांत सध्या तरी संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे या योजनेस दिलेले छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे नाव बदलून त्यांचा होणारा अपमान थांबवावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करायचा असेल तर राज्यतील शेतकऱ्यांना विनाअट, विना निकष सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांद्वारे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली.
राज्य शासनाने चार महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांना

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी जाहीर केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे, लागवड, मशागतीसाठी अवजारे व बैल पुरविले जात होते. तसेच दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तीन वर्षे शेतसारा माफ केला जात होता. त्यानंतर शेतकरी देईल तसा शेतसारा घेतला जात होता. राज्याच्या कोठारातून शेतकऱ्यांना मोफत धान्य पुरविले जात होते. त्यामुळे छत्रपतींच्या काळात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या झाली नाही. पण राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर करूनही आतापर्यंत 1850 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अजूनही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. खात्यावर जमा झालेले पैसे परत जात आहेत. काही शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम न मिळता तीनशे ते 400 रूपये मिळाल्याचे समजत आहे. एकुणच कर्जमाफीचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे छत्रपतींच्या नावाने असलेल्या योजनेतील या प्रकारामुळे त्यांचा अपमान होत आहे. तो थांबविण्यासाठी या योजनेचे नाव बदला. अथवा विना अट व विनानिकष सरसकट कजमाफी जाहीर करा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे. निवेदन देते वेळी आकाश हिवसे (शहर जिल्हा अध्यक्ष रा.वि.काँ.), प्रफुल्ल ठाकरे ,योगेश मोपरी (युवा शेतकरी),ऋग्वेद देशमुख,अक्षय महल्ले,अभिजीत धर्माळे,रोहन वानखडे,रोशन हिरुळकर,सुशील जायले, आदित्य काळे ,हर्षल रोंघे,गौरव धांडे,ऋषिकेश डोंगरे,ऋषिकेश बारब्दे व मोठ्या संख्येने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.