*रंगय्यापल्ली येथे रबरी बाल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन समारंभ संपन्न – जि. प. सभापती जयसुधा जनगाम यांच्या हस्ते उदघाटन संपन्न*

0
645
Google search engine
Google search engine

सिरोंचा / गडचिरोली :-

सिरोंचा तालुक्यातील रंगय्यापल्ली येथे एम.आर.एफ. क्रिकेट क्लब रंगय्यापल्ली कडून रबरी बाल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होता .
या स्पर्धेचे उदघाटन समारंभ जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा बानय्या जनगाम यांच्या हस्ते करण्यात आला.
या रबरी बाल क्रिकेट उदघाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून रंगय्यापल्ली ग्राम पंचायत सरपंच श्रीमती दुर्गम्मा सत्यम कोरेत , माजी सरपंच मधुसूदन चिंतावार, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रकाश चकिनारापवार, पंचायत समिती सदस्या शकुंतला सखाराम जोडे, सिरोंचाचे माजी उपसरपंच रवी सल्लमवार, रंगय्यापल्ली चे माजी उपसरपच श्रीनिवास गुरनुले, विय्यमपल्लीचे संतोष पडालावार, पोलीस पाटील इप्पा श्रीनिवास, दुर्गम बानाय्या, श्रीनिवास वैशाखा, नागराजू इंगीली आदी मान्यवर उपस्तित होते. या क्रिकेट स्पर्धेत परिसरातील 25 संघ भाग घेतले.


उदघाटन सोहळा यशस्वीतेसाठी एम.आर.एफ. क्रिकेट मंडळाचे अरुणकुमार नागोसे, सुरेश ठाकूर, लक्ष्मण बोल्ले, संतोष मल्लेबोईना, रघुपती कावडे, प्रभाकर लेंडगुरी आदींनी परिश्रम घेतले.