शेतमालाच्या हमीभावासाठी रक्त सांडवावे लागेल – खा. श्री राजु शेट्टी

0
710
Google search engine
Google search engine

आमला विश्वेश्वर येथे दुष्काळ परिषदेत मांडल्या शेतकऱ्याचा  व्यथा

 

चांदूर रेल्वे / शहेजाद खान  – 


स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालाला हमीभाव देऊ असे आश्वासन देऊन तीन वर्षापूर्वी सत्तेत आलेल्यांनी शेतकऱ्यांचा
विश्वासघात केला. शेतमालाला हमीभाव भिक मागून, आत्महत्या करून, निवेदने देऊन मिळणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना निर्धार करून रस्त्यावर उतरावे लागेल व वेळ प्रसंगी रक्त सांडवावे लागेल असे मत खा.राजु शेट्टी यांनी व्यक्त केले.

ते चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथे चांदूर रेल्वे तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना व जनता
दल यांच्या वतीने आयोजित ‘ दुष्काळ परिषदेत ‘ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा खा.राजु शेट्टी, प्रमुख पाहूणे म्हणून वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी
अध्यक्ष रविकांत तुपकर, प्रसिध्द उद्योगपती गुणवंत देवपारे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार,
जिल्हाध्यक्ष अमित अढावू, पं.स.सदस्या पुजा मोरे, प्रविण मोहोड, रवी पडोळे, अंकुश कडू, शाम अवथडे, शैलेश ढोबळे,
दामोधर इंगोले, अतुल ढोके, दयाल राऊत, अ‍ॅड.सुनिता भगत, पुरूषोत्तम काळे, डॉ.बावणे, मंगेश ठाकरे, रोहित माने,
ऋषीकेश राऊत, आशिष वानखडे उपस्थित होते.

 

 

यावेळी पुढे बोलतांना खा.राजु शेट्टी म्हणाले, एक दाण्याचे हजार दाणे करणाऱ्या शेतकऱ्यांचा  या स्थितीला ते, त्याचं
फुटक  नशीब जबाबदार नाही, तर या राजकत्र्यांनी जाणीवपूर्वक त्याचा विश्वासघात केला आहे. त्यामूळे शेतकऱ्यांना या
दारीद्राच्या विरोधात, न्याय हक्कासाठी, स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी लढायचे आहे. सरकारनं
सोयाबिनला ३०५० हमीभाव जाहिर केला, मात्र आज बाजारात सोयाबिनला १८०० ते २००० रूपये भाव मिळत आहे.
या देशात १९५५ साली जिवनावश्यक अधिनियम १९५५ लोकसभेत पास झाला. त्यानुसार केंद्राला ही अधिकारी व
जबाबदारी निश्चित केली. बाजारात कमी भाव असला तरी सरकारनं जाहिर केलेल्या हमीभावामध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल
खरेदी केला पाहीजे ही जबाबदारी सरकारची आहे. असे असतांना गेल्यावर्षी आम्ही पिकविलेल्या तूरीची काय अवस्था
झाली. प्रधानमंत्री यांनी ‘ मन की बात ‘ मध्ये लोकांना खाण्यासाठी व दाळीबाबत देश स्वंयपूर्ण करण्याचे आवाहन केले
होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही तूर, चना, मुग, उडिद, मसुर यांचे विक्रमी उत्पादन केले.त्याचवेळी परदेशातून ५०
लाख टन दाळ आयात करून शेतकऱ्यांच कबरडं मोडले. vidarbha24news त्यावेळी तूरीला ५२०० हमी भाव असतांना केवळ ४२०० रुपयात तूर विकावी लागली.

पश्चिम महाराष्ट्रात ऊसाला एफआरसी पेक्षा जास्त भाव मिळतो.त्यासाठी शेतकरी रस्त्यावर
उतरतो. मंत्र्याच्या गाड्या फोडतो, मंत्र्यांना तुडवतो आणि पोलीसांच्या गोळ्या छातीवर झेलायची तयारी ठेवतो. त्यामूळे
शासन ऊस उत्पादकाच्या वाट्याला जात नाही. विदर्भातील शेतकऱ्यांनि शेतमालाला हमीभाव, सिंचन प्रकल्प, जमीन,
पाणी व शाश्वत शेतीसाठी, बाजार शाश्वती जोपर्यंत मिळत नाही तो पर्यंत या पांढऱ्या कपड्याच्या पुढार्यांना पाय ठेवू देणार
असा निर्धार केला पाहीजे असे त्यांनी सांगीतले. यावेळी रविकांत तुपकर यांनी विदर्भातील शेतकऱ्यांची अवस्था
व्हेंटीलेटरवरील माणसासारखी झाली आहे.ते ना जगत आहे,ना मरत आहे. २०१४ मोदी सत्तेवर आले. मागचं बदमाश
होते. हे तरी शेतकऱ्यांचे निट करेल अशी खा.शेट्टींना आशा होती.

 

 

 

लग्नाच्या टायमाला ते तुम्ही म्हणाल तसं म्हणाले.
आमचे लग्न कमलाबाईशी लागले. लग्नानंतर ते जवळ येऊ देईना. आम्हाला वाटले लाजत असेल, आम्ही एक, दोन वर्ष
थांबलो. तिसऱ्या  वर्षी आमच्या ध्यानात आले आणि आम्ही भाजपशी घटस्फोट घेतल्याचे रविकांत तुपकर यांनी
सांगीतले. यावेळी आशिष वानखडे, सुधीर डोंगरे, पं.स.सदस्या पुजा मोरे यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरूवात बैलजोडीच्या पुजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर भगत यांनी तर संचालन प्रा.प्रसेनजित
तेलंग यांनी केले. या दुष्काळ परिषदेला आमला विश्वेश्वर परिसरातील व तालुक्यातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.