पद्मावती’ चित्रपटाच्या निषेधार्थ २ डिसेंबरला भव्य फेरी काढणार ! – नितीन चौगुले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

0
930
Google search engine
Google search engine

सांगली– पद्मावती या चित्रपटात हिंदुस्थानवर आक्रमण करणार्‍या परकीय, क्रूर, वासनांध अशा अल्लाउद्दीन खिलजीचे उदात्तीकरण करण्यात आले आहे. इतिहासात अस्तित्वात नसलेले अल्लाउद्दीन खिलजी आणि राणी पद्मावतीचे प्रेमप्रकरण या चित्रपटात घुसडवण्यात आले आहे. खरा इतिहास डावलून भन्साळी यांनी सवंग लोकप्रियतेसाठी या चित्रपटाची निर्मिती केल्याने समस्त हिंदु समाज आणि हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. हिंदु समाजाचा हा अपमान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कधीही सहन करणार नाही. महाराष्ट्रातील कोणत्याही चित्रपटगृहात पद्मावती हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये, यासाठी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. २ डिसेंबर या दिवशी सकाळी १० वाजता शिवतीर्थावरून भव्य दुचाकी फेरी काढून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात येणार आहे. तरी अधिकाधिक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह श्री. नितीन चौगुले यांनी केले आहे.