आरक्षण मागणाऱ्यांनो, राष्ट्रोन्नतीसाठी आरक्षणाच्या मोहाचा त्याग करून स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवून प्रयत्नरत व्हा !

0
723
Google search engine
Google search engine

१. विविध क्षेत्रांमध्ये आरक्षण मागणार्‍यांना विशेष अधिकार आणि आरक्षण दिले जाणे

‘सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये आरक्षण मागणार्‍यांना विशेष अधिकार आणि आरक्षण दिले जाते. जेथे क्षमता, गुणवत्ता आणि कौशल्य यांना निष्फळ करून केवळ आरक्षणाच्या बळावर आरक्षण मागणारे पदे भूषवतात, तेथे सर्वसामान्य जनांच्या मनात आरक्षण मागणार्‍यांच्या कर्तृत्वाविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण होते.

२. आरक्षण मागणार्‍यांनी आरक्षण आणि विशेष अधिकार यांचा मोह सोडून केवळ स्वबळ अन् कर्तृत्व यांवर विश्‍वास ठेवून धडाडीने प्रयत्न करणे देवाला अपेक्षित असणे

आरक्षण मागणार्‍यांनी आरक्षणाच्या कुबड्या फेकून द्याव्यात आणि स्वत:च्या कर्तृत्वावर विश्‍वास ठेवून कार्य करावे. असे केल्याने आरक्षण मागणार्‍यांची सुप्त क्षमता जागृत होईल आणि त्यांचे व्यक्तीमत्त्व उजळून निघेल. आरक्षण मागणार्‍यांना खर्‍या अर्थाने प्रगती करायची असेल, तर त्यांनी आरक्षण आणि विशेष अधिकार यांचा मोह सोडून केवळ स्वबळ अन् स्वकर्तृत्व यांवर विश्‍वास ठेवून धडाडीने प्रयत्न करणे देवाला अपेक्षित आहे.

३. आरक्षण मागणार्‍यांनी आरक्षणाचा मोह सोडला, तर सामाजिक आणि राष्ट्रीय उन्नती होऊन समष्टीचे कल्याण होणार असणेेे

आरक्षण मागणार्‍यांनी आरक्षण आणि विशेष अधिकार यांचा त्याग करून स्वकर्तृत्वावर विश्‍वास ठेवून प्रयत्न केले, तर प्रत्येक क्षेत्राची गुणवत्ता वाढेल. त्यामुळे प्रत्येक पदावर योग्य आणि गुणवान व्यक्तीची नियुक्ती होऊन शासन, प्रशासन इत्यादी क्षेत्रांतील कारभार सुरळीतपणे चालू लागेल. आरक्षण मागणार्‍यांनी आरक्षणाचा मोह सोडला, तर सामाजिक आणि राष्ट्रीय उन्नती होऊन समष्टीचे कल्याण होईल.’

– कु. मधुरा भिकाजी भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

ईश्‍वर केवळ गुणवत्ता पहात असल्याने त्याच्याकडेे आरक्षण मागणार्‍यांना अधिकार आणि आरक्षित जागा नसणे

‘ईश्‍वराकडे आरक्षण मागणार्‍यांना अधिकार, आरक्षित जागा इत्यादी नसते, तर ईश्‍वराकडे केवळ गुणवत्ता पाहिली जाते. आरक्षण मागणार्‍यांना अधिकार, आरक्षित जागा इत्यादी नको, तर त्यांच्याकडे गुणवत्ता हवी, तरच राष्ट्र आणि धर्म सुरक्षित रहातील. ईश्‍वरी राज्यात तसे असेल.’

– (परात्पर गुरु) डॉ. श्री आठवले

विशेष आभार – sanatanprabhat.org संकेतस्थळ