धरणग्रस्त रोहिणी महाजन यांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दि 6 डिसेंबर 2017 पासुन आमरण ऊपोषण

0
1396

सोलापूर – 1974 साली निमगाव टे ता माढा जि सोलापूर येथील लघु पाटबंधारे तलावासाठी कै सुधाकर रामचंद्र महाजन यांची 3 हे 62 आर जमिन पुर्ण संपादीत झाली आहे अद्याप त्याना किंवा त्यांचे वारसाना सदर जमिनीचा पुरेसा मोबदला/पर्यायी जमिन दिली नाही. कोणत्याही गरीब शेतक-यास भुमीहिन करायचे नाही असा कायदा असतानाही तत्कालीन शासनाने महाजन यांची संपूर्ण शेतजमिन संपादीत करुन भुमिहिन केले आहे. तेव्हा
पर्यायी जमीन /राहण्यासाठी भुखंड किंवा जमिनिचा वाढीव मोबदला आजचे बाजार भावाने मिळणेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयापासुन थेट मुख्यमंत्री यांचेपर्यत निवेदने देऊन मागणी केली परंतु रोहिणी महाजन याना पदरी निराशा आली. 14/4/2016 रोजी डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी आत्मदहन करण्याचा निर्णय रोहिणी महाजन यांनी घेतला होता.तेव्हा जिल्हा पुनर्वसन कार्यालयाने आत्मदहना सारखा घातक व टोकाचा निर्णय घेऊ नये कोर्टाचे आदेशानुसार कार्यवाही केली जाईल असे नमुद करुन आत्मदहनाचा निर्णय रद्द करावा अशी विनंती रोहिणी महाजन याना केली होती. त्यानंतर त्यानी आत्मदहनाचा निर्णय रद्द केला.वारंवार पाठपुरावा केला परंतु या वर्षात कोणताही सकारात्मक निर्णय जिल्हा पुनर्वसन कार्यालयाने घेतला नाही. कोर्टाने आदेश देऊनही काहीच देता येत नाही अशी भूमिका या कार्यालयाने घेतली आहे. तद्नंतर रोहिणी महाजन व सुमती महाजन यानी जिल्हाधिकारी सोलापूर यांचे कार्यालयासमोर दि 14/4/2017 रोजी आमरण. ऊपोषण सुरू केले. पण थातूरमातूरच ऊत्तरे जिल्हा पुनर्वसन कार्यालयाने दिली व अलहिदा कळवले.व ऊपोषण सोडण्यास भाग पाडले. सदर अधिकारी कायदाच नव्हता असे एकाच थाटणीत सांगतात, मग शासनाची ती परिपञके खोटी आहेत का ज्यात कोणत्याही गरीब शेतक-याला भुमीहिन न करणे व पर्यायी जमिन देण्याची तरतुद आहे. शेवगाव तालुक्याच्या थाटे वडगाव येथील केशरबाई दराडेना शासनाने पाझर तलावासाठी संपादीत जमिनीचा योग्य मोबदला देऊन 40 वर्षे मागणी केल्यानंतर आता पुनर्वसन केले आहे.तशीच दखल घेऊन मलाही न्याय द्यावा अशी मागणी रोहिणी महाजन यांनी केली आहे. या मागणीकडे लक्ष वेधावे म्हणुन वैतागून रोहिणी महाजन यांनी महापरिनिर्वाण दिन दि 6 डिसेंबर 2017 पासुन विभागिय आयूक्त पुणे यांचे कार्यालयासमोर ऊपोषणास बसण्याचे ठरविले असुन सुमती महाजन यांनी त्याना पाठींबा देत एक दिवसाचे लाक्षणीक ऊपोषण दि 6/12/ 2017 रोजी करण्याचे ठरविले आहे
“आम्ही भुमीहिन झालो आहोत. शासनाने आमची जमिन संपादीत करुन आमचे जीवन ऊद्धवस्त केले आहे घरातील चार माणसे या मागणीचा संघर्ष करत मरण पावली पण शासन पुनर्वसनाची जबाबदारी टाळत आहे. त्याकाळी पुनर्वसन कायदा अस्तित्वात नव्हता मग आम्हाला भुमीहिन करुन आमचे जीवन ऊद्धवस्त कोणत्या कायद्याने केले” असा संतप्त सवाल त्यानी शासनाला केला असुन राहण्यासाठी भुखंड अथवा आजच्या बाजारभावा प्रमाणे जमिनीचा मोबदला देण्याचा निर्णय तात्काळ न घेतल्यास दि 6 डिसेंबर 2017 पासुन पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर रोहिणी महाजन या ऊपोणास बसणार आहेत असा ईशारा मुख्यमंत्री,महसुल व पुनर्वसन मंञी,राज्य मंञी, पालकमंत्री सोलापूर,विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी सोलापूर, जिल्हा पुनर्वसन आधिकारी सोलापूर, पोलीस निरीक्षक बंडगार्डन पुणे याना पाठवलेल्या निवेदनात त्यानी दिला आहे.