रॅलीच्या माध्यमातून प्लास्टिक निर्मुलनाचा संदेश . माणुसकी बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम

0
674
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )  –
     अनुगामी लोकराज्य महाभियान व माणुसकी बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने चांदुर रेल्वे शहरामध्ये काढण्यात आलेल्या रॅलीतून स्थानिक  जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक निर्मुलनाचा संदेश दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी कापडी पिशवी वापराचा संकल्पही केला.
   कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्याच्या वापरावर शासनाने बंदी घातली आहे.परंतु शासनाच्या या निर्णयाकडे प्रभावी जनजागृती अभावी ठिकठिकाणी पाठ दाखविली जात आहे.सर्वत्र प्लास्टिकच्या अतिरेकी वापरामुळे प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.अनेक नाल्या – गटारांमध्ये प्लास्टिक पिशव्या अडकून सांडपाणी वाहुन जाण्यास अडथळा निर्माण होतो,शिवाय ठिकठिकाणी साठून राहाणाऱ्या सांडपाण्यामुळे डासांची निर्मिती होत असल्याने नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव आहे.
   रॅलीच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांनी प्लास्टिक पिशव्याच्या अतिवापराचे दुष्परिणामही नागरिकांना समजावुन सांगितले.”प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा..होणाऱ्या प्रदुषणाला आळा घाला” यासह विविध घोषणाही देण्यात आल्या.रेलीच्या समारोपीय कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह सर्व उपस्थितांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार नाही, कुठल्याही कामासाठी कापडी पिशव्यांचा वापर करण्याची शपथ घेतली.या उपक्रमाच्या माध्यमातुन शहरातील हॉटेल,कँटींग,पान टपरी तसेच घरामध्ये जाऊन कचरापेट्या व जनजागृतीपर पत्रके वाटण्यात आली, शिवाय गोळा होणारा कचरा कचरापेटीतच का टाकावा याविषयी जनजागृती करण्यात आली. सदर कार्यक्रमाला अनुलोम चे प्रशांत सीसोदीया,माणुसकी संस्थेचे प्राविण्य देशमुख,भूषण सरदार, दिनेश वाघाडे, मुस्तफा बोहरा,शैलश जालान,सनी सावंत,हृषीकेश ठाकरे,संकेत पुंड, शुभम देशमुख, मोंटु चुडे,शहजाद सौदागर, आदेश राजनेकर,आशीष सोनटक्के, डॉ.अभिषेक कोल्हे, पंडेकर सर, नंदुभाऊ सोरगीवकर,गोटु गायकवाड,विक्रम तायडे, प्रतिक राय  यांसह विद्यार्थ्यांनी व शिक्षकेत्त्त्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.