जिल्हाधिकारी कार्यालयावर भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे धरणे आंदोलन. – “ सरकारच्या धोरणांविरोधात व्यक्त केली तीव्र नाराजी.”

0
832
Google search engine
Google search engine

युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष भाई.महेश कडूस पाटील उपस्थित.

नाशिक :-

आज दिनांक ५ डिसेंबर २०१७ रोजी भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.शेतीमालाला योग्य व किफायतशीर भाव द्यावा,अवास्तव वीज बिल रद्द करून वीज पुरवठा नियमित करण्यात यावा,वाढते पेट्रोल,डिझेल व गॅस चे दर नियंत्रित करण्यात यावेत इत्यादी मागण्यांकरता धरणे आंदोलन युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष भाई महेश कडूस पाटील यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आल्याची माहिती शेतकरी कामगार पक्ष नाशिक जिल्हा चिटणीस भाई मनीष बसते यांनी दिली.केंद्रात राज्यात भाजपचे संयुक्त सरकार सत्तेवर येताना दिलेली आश्वासने सत्तेत आल्यावर केलेल्या घोषणा फसव्या असून त्यांची अंमलबजावणी करण्यात अली नसल्याने सरकारच्या शेतकरी कामगार वर्गाविरोधातील धोरणांमुळे समाजातील सर्व घटकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून हे शेतकरी,कष्टकरी युवक मित्रांचे प्रश्न  मार्गी लागावेत म्हणून सदैव प्रयत्नशिल राहणार असल्याचे प्रतिपादन यावेळी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे  युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई.महेश कडूस पाटील यांनी केले.”

 

                                                             “विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विविध भत्ते वेळोवेळी मिळत नसल्यामुळे विद्यार्थीसुद्धा अडचणींना सामोरे जाताना दिसत आहेत.ऐन परीक्षांच्या कालावधीत त्यांना शिष्यवृत्ती करता बँक अकॉउंट ला आधार सोबत लिंक करायला तासंतास बँकेच्या रांगेत उभे राहावे लागत असून विद्यार्थ्यांनी बँकेच्या लाईन मध्ये उभे राहावे कि परीक्षांचा अभ्यास करावा? या सरकारने विद्यार्थ्यांना पण सोडले नाही.!” असा उपरोधिक टोला शेतकरी कामगार पक्षाचे विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष भाई. प्रणव टोम्पे पाटील यांनी लगावला.

 

धरणे आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेकाप युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष भाई.महेश कडूस पाटील,जिल्हा चिटणीस मनीष बसतें, भाई.अशोक बोराडे,भाई पी.बी. गायधनी,भाई.करू पाटील हगवणे,शेकाप विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष भाई.प्रणव टोम्पे पाटील,शेकाप युवक जिल्हाध्यक्ष विकास मोरे, कृषि पदवीधर संघटना विद्यार्थी अध्यक्ष गिरीश वैष्णव, दिनकर डोरले,कचरू पाटील,निवृत्ती गायधनी,अशोक वाजे,परमेश्वर नाथे आदी व कार्यकर्ते उपस्थित होते.