श्री प्रसाद लाड विजयी ; कॉंग्रेस राष्ट्रवादीची 9 मते फुटली

0
816
Google search engine
Google search engine

मुंबई : विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रसाद लाड यांचा दणदणीत विजय झाला आहे. एकूण 284 मतदान झाले. दोन मते बाद झाल्यानंतर उरलेल्या मतांपैकी लाड यांना 209 मते तर कॉंग्रेसच्या दिलीप माने यांना 73 मते मिळाली. एमआयएमच्या दोन जणांनी मतदान केले नाही. धक्कादायक म्हणजे या निवडणुकीत कॉंग्रेस राष्ट्रवादीचे 9 मते फुटल्याचे समोर आले आहे.

 

माजी मुख्यमंत्री नारायण राणें यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर बहू चर्चित विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झाले. शिवसेनेच्या पाठिंब्याने भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांनी बाजी मारले. भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना भाजपचे 122, शिवसेनेचे 63, बहुजन विकास आघाडीचे 3, अपक्ष 7, रासपा, मनसे यांच्यासह 195 मते अपेक्षीत होते. मात्र त्यांना 209 मते मिळाल्याने या निवडणुकीत क्रॉंस वोटींग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

पक्षीय बलाबल पुढील प्रमाणे- 
भाजप – 122, शिवसेना- 63, कॉग्रेस- 42, राष्ट्रवादी- 41, शेकाप- 3, बविआ- 3, एमआयएम- 2, अपक्ष- 7, सपा- 1, मनसे- 1, रासपा- 1 कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया- 1