वरुड येथे मान्यवरांच्या मांदियाळीत कृषी विकास परिषदेचा थाटात शुभारंभ

39

वरुड – शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गावागावांमध्ये विविध प्रकल्प उभे करावे या उद्देशाने कृषी विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने कृषी मित्र इव्हेंट्स व वरुड मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. अनिल बोन्डे यांच्या पुढाकारातून वरुड येथे कृषी विकास परिषद २०१७ आयोजित केली आहे, या कृषी विकास परिषदेला आज सुरुवात झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात संपन्न होत असलेल्या या कृषी विकास परिषदेत अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

या प्रसंगी या कार्यशाळेचा शुभारंभ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम.भाले यांनी केले तयार १८ महिन्यात ११ पिके घेऊन विक्रमी उत्पन्न घेणारे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सातारा येथील प्रगतिशील शेतकरी शंकर खोत यांनी मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर मातोश्री त्रिवेणी बोन्डे महिला सूतगिरणीच्या अध्यक्षा डॉ. वसुधा बोन्डे , वरुडच्या नगराध्यक्षा स्वाती आण्डे ,शेंदुर्जना घाट चे नगराध्यक्ष रुपेश मांडवे, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, वरुडचे तहसीलदार आशिष बिजवल ठाणेदार गोरख दिवे, तालुका कृषी अधिकारी उज्वल आगरकर, प.स.कृषी अधिकारी आर.बी.सावळे, प.स.गटविकास अधिकारी राठोड, प.स.सदस्य अंजली तुमडाम, ललिता लांडगे, माजी नगराध्यक्षा सरिता खेरडे, नलिनी रक्षे, निशा पानसे, मनीषा मानेकर,चैताली ठाकरे, प्रीती कोसे,रेखा काळे, अर्चना आजणकर, सुवर्णा तुमराम, भारती माळोदे, मंदा आगरकर, शुभांगी खासबागे, पुष्प धकीते, प्रतिभा बुरंगे, रेखा अढाऊ, मंदा वसुले, मोनिका भोंगाडे,माया बासुंदे, प्रतिभा राऊत,नीलिमा कांडलकर, सुनीता वंजारी, हर्षा घोरपडे, सारिका बेलसरे, राजश्री डोईजोड, जया श्रीराव, रजनी भोंडें आदींची उपस्थिती होती.

यावेळी डॉ. वसुधा बोन्डे यांनी आपल्या प्रास्ताविकातून शेतकऱ्यांना योग्य ज्ञान मिळाले पाहिजे नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग शेतावर होणे गरजेचे आहे यातूनच शेतकरी समृद्ध होईल याच तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहचावी व शेतीची उद्यमशीलता वाढावी, शासकीय योजनासह विविध कंपन्यांचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारावर उपलब्ध व्हावे यासाठी या कृषी विकास परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन त्यांनी केले डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम.भाले यांनी आपले विचार व्यक्त करतांना नफ्याची शेती करणे गरजेचे असून त्यासाठी संशोधन सुरु आहे शेतकऱ्यापर्यंत ते शसंशोधन पोहचवण्याची गरज असून शेतीशिवाय पर्याय नाही येत्या काळात दुर्लक्षित झालेली शेती कसण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे यासाठी शासकीय योजना तयार करण्यात आली आहे बाजारपेठेच्या अंदाज घेऊन केकेली शेती हि अधिक फायदेशीर असते शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणणे गरजेचे असून शेती पुढील दहा वर्षात कात टाकणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले कराड येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शेतकरी शंकर खोत यांनी सुद्धा आपले विचार यावेळी मांडले ते म्हणाले कि हवा ,माती ,पाणी ज्याला समजले त्याला शेती समजली शेतकऱ्यांनी माती जपण्याचे काम केले पाहिजे सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करून सापळा पीक पद्धती अवलंबली तर भविष्याचा उज्वल सुवर्णकाळ दिसून येईल शेतीपूरक जोड धंद्याची कास धरल्याशिवाय तरणोपाय नाही दूरदृष्टी ठेऊन शेतीविषयक कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे शेतकऱ्यांनी असंतुलित शेती करू नये असे विचार व्यक्त करून उत्पन्नवाढीचा मूलमंत्र यावेळी त्यांनी दिला . या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती