आज चांदूर रेल्वेत ‘ भव्य रोग निदान ‘ शिबिर – महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत आयोजन <><> सकाळी ८ वाजतापासुन होणार नोंदनी सुरू

0
671
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वेः – (शहेजाद खान ) 

महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत जिल्हा सामान्य रूग्णालय, अमरावती, डॉ.बारब्दे हॉस्पीटल, कॅम्प रोड, अमरावती व माझी माय हॉस्पीटल, चांदूर रेल्वे यांच्या वतीने आज रविवारी (ता. १० दिसेंबर) मोफत भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन स्थानिक जिल्हा परिषद हायस्कुलमध्ये करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये मेंदूचे आजार, हृदयरोग, श्वसन रोग, अस्थिरोग, फॅ्रक्चर, बालरोग, स्त्री रोग, पोटाचे आजार सर्व प्रकारच्या आजाराची मोफत तपासनी व औषधोपचार तज्ज्ञ डॉक्टराची चमू करणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार रक्तांची तपासनी, इ.सी.जी.मोफत केल्या जाईल तर शिबिरामधील रूग्णांवर शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत करण्यात येणार आहे. या भव्य रोग
निदान शिबिराचे रूग्ण नोंदनी आज रविवारी सकाळी ८ वाजता सुरू होणार असून रूग्णांनी येतांना राशन कार्ड व आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. शिबीरामध्ये रूग्ण तपासणी ११ ते ४ वाजता दरम्यान होणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वसामान्यांच्या चांगले आरोग्य व उत्तम रोग उपचार मिळावे यासाठी शासनाने सुरू केली असुन या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावे असे आवाहन डॉ. इंद्रजित किल्लेदार, गजानन पांडे, डॉ.राजेंद्र ठाकुर यांनी केले आहे.