गौवंश विक्रेता आणि गावठी दारू विक्रेता पोलिसांच्या जाळ्यात – ठाणेदार सचिन तायवाडे याच्या टीम ची कार्यवाही

0
862

बादल डकरे / चांदुर बाजार –

(चांदुर बाजार):-चांदुर बाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी दिनांक 7 डिसेंबर ला गुप्त माहितीच्या आधारे गौवंश मास विक्री करणाऱ्याला ताब्यात घेतले.या सर्व प्रकरणात पोलिसांनी 7 डिसेंबर ची संपूर्ण रात्र जागरण केले आणि नियोजन बद्द सापळा रचून आरोपीला रंगे हात पकडले.

ब्राम्हणवाडा थडी येथील रहिवासी मुश्ताक खा इब्राहिम खा वय 45 वर्ष याची घरी ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी दिनांक 7 डिसेंबर च्या सकाळच्या सुमारास रेड केली असता त्याच्या कडून 80 किलो गौवंश मास,चमडी,मास कापण्याचे साहित्य,वजन काटा,अशा एकूण 10590 रुपये चा माल जप्त करण्यात आला आहे.यात आरोपीला घटना स्थळावरूनच अटक करण्यात आली आहे.

दिनांक 7 डिसेंबर ला सायकलच्या सुमारास ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी घातलाडकी फाट्यावर नाकाबंदी केली असता त्यांना दिवाकर मारोती आके वय 22 वर्ष रा घातलाडकी याला ताब्यात घेतले असता त्याच्या कडून 60 लिटर गावठी दारू एक सायकल किंमत अंदाजित 500रुपये एकूण 6500 चा माल जप्त करण्यात आला.

वरील दोन्ही कार्यवाही ठाणेदार सचिन तायवाडे,पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे,महिला पोलीस उपनिरीक्षक मंगला सानप, राजेंद्र हिरुळकर,दीपक पाल,जितेश सावरकर,राजेश वासनिक,नितीन वाघ,प्रदीप पाटील, पोलीस हेड कॉस्टबल रविंद्र शिंपी,नाईक पोलीस कॉस्टबल त्रंबक सोळंके,महेंद्र राऊत,यांनी ठाणेदार तायवाडे याच्या मार्गदर्शन खाली केली.